Horror

“गावाकडच्या भुताच्या गोष्टी- २” | “आशा” हडळीचा बदला

Written by admin

व्हायरल महाराष्ट्रच्या “गावाकडच्या भुताच्या गोष्टी” सदरातली ही दुसरी गोष्ट… तुम्हाला आवडली असेल तर नक्की #SHARE करा अन सोबतच कमेंट मध्ये सांगा आम्हाला “कशी वाटली ते” सोबतच तुमच्याकडे एखादी भुताची गोष्ट असेल तर आमच्या पेजच्या Timeline वर पोस्ट करा आम्ही तुमच्या नावासकट ती गोष्ट प्रकाशित करू.

जोशींच्या वाड्यात आज सनई चौघडा वाजत होता, आज त्यांच्या धाकट्या मुलीचे… निमाचे लग्न होते, खूप पाहुणे आले होते सोबतच गावातील माणसे जमले होते,

वातावरण आनंदाने भरून गेले होते, पण निमाची बहीण आशा खूप रडत होती, कारण काय?? तर तिला पहायला आलेल्या मुलाच्या नजरेस निमा पडली..!! अन तीच जमायचं तर निमाच लग्न जमले, वास्तविक पहाता आशा दिसायला सुंदर होती, गोरीपान नाकेडोळी नीटस..!! पण का कुणास ठाऊक  सावळी… अपुऱ्या/चपट्या नाकाची निमा त्याला आवडली, तिच्यातील अल्लड खट्याळपणा मुलाला भावला.

आता हेच पहा ना स्वतःच्या सप्तपदी च्या वेळी निमा नवऱ्याच्या कानात काहीतरी सांगून हसत होती, आशाला हा आपला अपमान वाटला …. झाल्या प्रकारामुळे आशा आधीच चिडली होती, सोबत तिला अस वाटायला लागल कि निमा तिलाच हसतेय …!! आशा सुडाने पेटली, लहानपणापासूनच आशा थोडी एककल्ली होती, हट्टी होती, समजा तिला एखादी गोष्ट पाहिजे तर काहीही करून ती गोष्ट ती मिळवणारच..!! पण या उलट निमा समंजस, निमाने आजपर्यंत आपल्या वाट्याला आलेल्या सगळ्या गोष्टी आशाला दिल्या होत्या, पण दैवगती पहा आज अशासाठी आलेला मुलगा निमाचा नवरा झाला, आई वडिलांनी विचार केला कि आशा सुंदर आहे तिला काय कुणीही होकार देयील पण निमा थोडी सावळी !, आता हा मुलगा निमाला पसंत करतोय, चांगल घरंदाज स्थळ आहे तर इच तर इच लग्न तर करून टाकूयात….  घरात दोन उपवर मुली आहेत निदान एका जबाबदारीतून तरी मोकळे होऊ,

पण आशा सुडाने पेटली होती कुणाचे लक्ष नाही पाहून ती रागारागाने वाड्याबाहेर पडली. आशावर आईचे खूप प्रेम होते आशाचे काहीही चुकले तरी आई नेहमी तिला सांभाळून घेत असे तिच्यासाठी वेगळा खाऊ लपून ठेवत असे, वडील मात्र स्वभावाने कडक होते त्यांना असले फाजील लाड केलेले आवडत नसत. असो निमाची सासरी पाठवणी केल्यावर आईच्या लक्षात आले कि आशा कुठे दिसत नाही, तिने शोधाशोध सुरु केली, सगळीकडे शोधाशोध झाली, पण आशा कुठेही सापडली नाही. आनंदाच्या क्षणी अशा प्रकारे घरावर काळजीचे सावट पसरले. अशात मुसळधार पाऊस सुरु झाला कधी नव्हे एव्हड्या जोरात विजा कडाडत होत्या..!! काळजीच्या त्या वातावरणात वाऱ्याचा आवाज अत्यंत भयावह असा वाटत होता. तिन्हीसांजेची वेळ सांगुनी रात्र व्हायला आली होती, आणि घराभोवती एक टिटवी या पावसातही ओरडत घिरट्या घालत होती, तेव्हड्यात जोराचा वारा घरात शिरला अन खिडक्या दारे भीतीने थरारली…!!! समोरचा आरसा खाली पडून फुटला;  हि अशुभाची चाहूल होती, सारखे अपशकुन होत होते… काहीतरी विचित्र, अमानवीय घडले होत.

दुसऱ्या दिवशी सकाळीच घरातील गडी धावतच आत आला, भांबावलेल्या अवस्थेत त्याने आशाच्या बाबांच्या कानात काहीतरी सांगितले, बाबा अक्षरशः हादरून गेले होते..!! तरी कसाबसा धीर धरत ते धावतच वाड्यामागे गेले, पाहतात तर काय …!!
विहरीच्या पाण्यावर आशाचे प्रेत तरंगत होते, ते फुगले होते. पोलिसांना बोलावले गेले प्रेत बाहेर काढले. कालसारखीच गर्दी जमली होती..!! पण या गर्दीतल्या प्रत्येकाला हळहळ वाटत होती, काळासारख आनंदाचवातावरण नवत. आशाची आई हंबरडा फोडून रडत होती, आज तिच्या काळजाचा तुकडा तुटून पडला होता, बाबांची तर विचार करायचीच क्षमता राहिली नवती …. एक जागी निशब्ध उभ राहून ते नियतीला प्रश्न विचारीत होते … का?? शवविच्छेदन होऊन प्रेत हातात मिळेपर्यंत खुप वेळ लागला. विहिरीतून काढले तेव्हा प्रेताला दुर्घन्दी येत होती, सोबतच ते भयानक दिसत होते. उघडे डोळे… विखुरलेले केस यामुळे ते भयानक दिसत होते. गावात वेगवेगळ्या गोष्टी उठू नयेत म्हणून आशाला लवकरच अग्नी दिला. शास्रानुसार पहाता लग्न न झालेली व्यक्ती मेली तर तिच रुईच्या झाडासोबत लग्न लावतात… पण इथे वेळच नव्हता, विचार करणारे बाबा… धक्क्यातून सावरलेच नवते… घरावर शोक कळा पसरली होती, लग्नानंतर राहिलेल्या पाहुण्यांनीच सगळी व्यवस्था केली.

रात्री उशिरापर्यंत बाबा, आशाच्या चितेपाशी बसून होते… कुणीतरी त्यांच्या शेजारी बसून आहे याची सतत जाणीव त्यांना होत होती ….  स्मशानातून परत येतानासुद्धा मागे कुणाची तरी पाऊले वाजतायेत असाच त्यांना वाटत होत पण तिथे कोणीच नव्हते,

या घटनेला साधारणपण चार ते पाच महिन्याचा काळ लोटला निमाला दिवस गेले होते, तिची चोर ओटी भरायची होती म्हणून ती माहेरी आली, आज खूप दिवसांनी त्या घरात आनंद निर्माण झाला होता, अमावस्येची काळी रात्र होती घरातील सगळेजण हसत बोलत बसले होते.. या गप्पांमध्ये रात्रीचे साडेबारा कधी वाजले कुणाच्या लक्षातच आल नाही, बाहेर कुत्रे जोर जोरात रडत होते, अन …!! दरवाज्यावर कुणाचीतरी थाप पडली…!! बाबानी पटकन दरवाजा उघडला, तर थंड हवेचा झोत आत आला.

समोर ती उभी होती..!!! तिचे केस मोकळे सोडलेले होते, पांढरीशुभ्र साडी नेसली होती, तिचे डोळे पांढरे होते त्यात काळी बुबुळे नव्हती,

सगळेजण श्वास रोखून बघत होते, तिने निमाची मानगूट पकडली, अन तिला बाहेर खेचले. हे पाहून आई पुढे आली, व हात जोडून कळवळून बोलली आशा बाळा एक मुलगी तर मी गमावली आहे… दुसरी हिरावून घेऊ नकोस …. मला माहितीये तुझा राग आहे तिच्यावर पण जर तिला तू काही केलस तर देवसुद्धा तुला कधी माफ करणार नाही, ती दोन जीवांची आहे, तिच्या पोटात मुल आहे…!!  तिला  सोड अग आम्ही तुझेही लग्न करून देणार होतो, निमापेक्षाही चांगले घर तुझ्यासाठी आम्ही शोधले होते, तू दिसायला सुंदर होतीस … तू आम्हाला सांगायलाही वेळ दिला नाहीस. बाळा सोड तिला हे भ तूला त्याच घरात जायचे आहे ना ??? मग निमाच्या पोटाला ये…. बाळा परत माझ्या मांडीवर खेळ तुझ्या जाण्याने मी कोसळले आहे… परत ये …… अस बोलत आई धाय मोकलून रडू लागली
आशाने निमाला सोडले … ती मागे मागे जाऊ लागली आणि भयंकर रडण्याचा आवाज आसमंतात भरून राहिला

या गोष्टीला जवळपास ४-५ महिने झाले असतील…आज निमाच्या बाळाचे बारसे होते, निमाचे घरचेसुद्धा आज निमाच्या बलाला पाहणार होते. घरात खूप बायका जमल्या होत्या.

पण का कुणास ठाऊक बाळ मात्र खूप रडत होते, कुणालाच ऐकत नव्हते, मग बाळाची आजी घुगऱ्या घेऊन बाहेरच्या खोलीत आली, तिने गोप खेळवत बाळाला हाती घेतले, ती पहाते ते काय हनुवटी वरील खड्डा…!! तीच गालावरील खळी, तिला ओळख पटली, तिने बाळाच्या कानात नाव ठेवले …आशा !!!  बाळाने नाव ऐकताच आईचे ….बोट पकडले तिच्या आशा पूर्ण झाल्या होत्या मायलेकराची भेट झाली होती, आणि तिथे फक्त वात्सल्य ओसंडून वाहत होते,


– नि. सोनटक्के

 

About the author

admin

Leave a Comment

ten − 6 =