Spread the love

उना अन कठुवा बलात्काराने पूर्ण देश हेलावला असताना, गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी स्मृती इराणी यांच्यावर निशाना साधला आहे. याबाबत हार्दिक पटेल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर वर लिहले.

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर आज मंत्री वावरत असणाऱ्या स्मृती इराणी यांनी तेव्हाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या, आता देखील उन्नाव आणि कठुआमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर स्मृती दीदी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बांगड्या पाठवणार का? असा प्रश्न नेता हार्दिक पटेल यांनी विचारला आहे.

यासोबतच त्यांनी प्रधानमंत्री मोडी यांच्यावरही निशाना साधला, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिथे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’  अशा पोकळ विजनवर जोर देताना दमत नाहीत, तिथेच त्यांच्या पक्षाचे शासन असणाऱ्या राज्यांमध्ये गैंगरेप च्या दोन घटनान्नी फक्त देशवासियांना शर्म्सार केले नाही तर महिला सुरक्षेच्या दाव्यांची सुद्धा खरी परिस्थिती समोर आणली आहे.”

यापुढे ते लिहतात कि ” भाजप सरकारमध्ये जर एखाद्या मुलीचा बलात्कार झाला तर ती मुलगी नाही का?? जर कॉंग्रेस सरकार मध्ये अशा घटना झाल्या असत्या तर भाजपने संपूर्ण देशात हिंसा घडवली असती. जागो भारत जागो, फक्त केंडल मार्च ने काही होणार नाही, सगळ्या देशाला स्वतःची जबाबदारी घेऊन पुढे यायला हवे”

सध्या देशातील सामाजिक राजकीय वातावरण उन्नाव आणि कठुआमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनांनी ढवळून निघाले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या घोषणा देतात. दुसरीकडे भाजपाच्याच राज्यात महिला सुरक्षित नसल्याची टीका हार्दिक पटेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.