Spread the love

जगातील सर्वात गरम जागा.. जिथे राहणे तर सोडा जिवंत राहणेसुद्धा अशक्य होते… उन्हाळ्याला नुकतीच सुरवात झालीय, अन अंगातून घामाच्या धारा वाहायलासुद्धा लागल्यात. तापमानाचा पारा अजूनतरी ४०च्या पार गेला नाही, पण लवकरच तो नक्कीच जायील. तर या गर्मीची या वातावरणाला तुमच्यासाठी थोड हलके करण्यासाठी व्हायरल महाराष्ट्र सांगणार आहे.. जगातल्या सर्वात जास्त गरम अशा ५ ठिकाणांबाबत.

दश्त ए लूट, ईरान

इराणमधले हे वाळवंट पृथ्वीवरची सर्वात गरम जागा मानले जाते, २००३ ते २००७ दरम्यान झालेल्या एका सेटेलयीट मोजमापानुसार हे समोर आल कि इथे सर्वात जास्त तापमान ७०.७ डिग्री अंश नोंदवलेले आहे. अन म्हणूनच या वाळवंटाला सर्वात गरम जागा म्हटल जाते पण “जगातली सर्वात कोरडी जागा” हि उपाधी मात्र चिलीमधल्या अटकामा वाळवंटासोबत वाटून घ्यावे लागले आहे. एक मजेची गोष्ट म्हणजे या वाळवंटाच्या मोठ्या भागात एकही जीव जिवंत नाहीय… सूक्ष्मजीवसुद्धा नाही..!!

डेथ वैली, कैलिफोर्निया, अमेरिका

दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिकेची डेथ वेली, १९१३ मध्ये इथला पार ५६.७ वर गेला होता. हि उत्तर अमेरिका खंडातली सर्वात कोरडी जागा आहे. अन इथले सामान्य तापमान हे 47 डिग्री इतके असते.

अजीजियाह, लीबिया

लिबियाच्या राजधानी त्रिपोलीपासून अवघ्या २५ मैलावर असलेल अजीजीयाह सुद्धा आपणच जगातली सर्वात गरम जागा असल्याचा दावा करते. १९२२ मध्ये इथले तापमान ५८ डिग्री इतके गेले होते, पण नंतर काही हवामानशाश्रींनी सांगितले कि हा आकडा चुकीचा आहे कारण ज्याने हे तापमान मोजले त्याला याचा काहीही अनुभव नवता. इथले साधारण तापमान हे ४८ डिग्री इतके असते.

वदी हाल्फा, सूडान

हे शहर सुदानच्या नुबिया सरोवराच्या काठावर वसलेले आहे, मागचे काही वर्षे इथे पावसाचा थेंबसुद्धा पडलेला नाही. इथले सामान्य तापमान ४१ डिग्री असते तर एकेकाळी इथल्या तापमानाने ५३ डिग्रीचा आकडा पार केलेला आहे.

तिरुत जवी, इजरायल

आपल्या आशिया खंडात या ठिकाणाला दुसरे सर्वात गरम ठिकाण संबोधले जाते. १९४२ मध्ये इथे तब्बल ५४ डिग्री इतके तापमान नोंदवले गेले होते.