Spread the love

इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचे निधन

दिनांक- २५ जुलै २०१७पर्यंत

इस्रोचे माजी अध्यक्ष प्रोफेसर उडुपी रामचंद्र राव (यू.आर. राव) यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षाचे होते.

प्रोफेसर राव यांनी 1972 साली भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदारी घेतली होती.

उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म कर्नाटकातील अदमारू या खेडेगावात 10 मार्च 1932 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता.

प्रोफेसर राव यांचा आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने प्रतिष्ठित ‘द 2016 आईएएफ हॉल ऑफ फेम‘ मध्ये समावेश केला होता.

2013 मध्ये वॉशिंग्टन येथे ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले ते पहिले भारतीय आहेत.

1984 ते 1994 या काळात त्यांनी देशाच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते.

‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली ‘भास्कर’, ‘अ‍ॅपल’, ‘रोहिणी’, ‘इन्सॅट‘ आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.

अंतराळ क्षेत्रातील राव यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत 1976 साली त्यांचा पद्म भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर यावर्षी 2017 मध्ये त्यांचा पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.