Categories: Uncategorized

आंबे विकून शिक्षण, बिना चपलेचे जायचे कॉलेज ला !! भारताला चंद्रावर नेणाऱ्या अवलियाची गोष्ट

तुम्हाला भारताचे चांद्रयान २ तर माहितीच असेल !! काल रात्री चांद्रयान २ चा ओर्बीटर चंद्राभोवती फिरत होता अन त्यामधून विक्रम रोवर चंद्राच्या आपल्याला न दिसणाऱ्या भागावर उतरणार होते पण अचानक विक्रमसोबतचा संपर्क तुटला. या मोहिमेचा थेट प्रक्षेपण तुम्ही व लाखो भारतीयांनी पहिले असेल. यावेळी एक संशोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू त्या हजारो संशोधकांच्या प्रयत्नांची जिवंत साक्षच जणू देत होते.

पंतप्रधानांच्या गळ्यात पडून रडणाऱ्या या शास्राज्ञाच नाव आहे के. सिवन. इस्रो चा प्रमुख असणाऱ्या या माणसाने अंतराळ जिंकून घेण्याची अन भारताच नाव अंतरिक्षात सुवर्णाक्षरांनी कोरण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. काल जे काही झाल, आपण यशस्वी झालो कि नाही हे लवकरच कळेल, पण जी गोष्ट आजपर्यंत जगातला कोणतही देश करू नाही शकला टी गोष्ट आपण जवळपास केलीच होती.

आंबे विकून शिकले के सिवन

के सिवन यांचे संपूर्ण नाव आहे कैलाशावादिवो सिवन, कन्याकुमारी जवळील सरक्कालविलाई नावाच्या एका खेड्यात अन अत्यंत गरीब अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पाचवीला गरिबी पुजलेली असल्याने शिक्षण घेणे ही त्यांच्यासाठी जणू Luxery होती. गावातल्या सरकारी शाळेत त्यांनी कसेबसे ८ वी पर्यंत शिक्षण घेतले, पुढच्या शिक्षणाची सोय मात्र गावात नवती अन बाहेर शिकण्याइतके पैसे त्यांच्या कुटुंबाकडे नवते.

सिवन यांची शिकण्याची इच्छा इतकी दुर्दम्य होती कि त्यांनी एक उपाय काढला ते बाजारात जाऊन आंबे विकायचे अन त्यातून होणाऱ्या नफ्यातून आपल्या शाळेची फी भरायाचे. जेव्हा ते इस्रो चे प्रमुख झाले तेव्हा दिलेल्या आपल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते कि.

” मी एका गरीब कुटुंबात जन्मलो, मोठ्या भावाकडे पैसे नसल्याने माझी शाळा बंद झाली होती. माझे वडील बाजारात आंबे विकायचे मी पण सायकल वर बाजारात जाऊन आंबे विकणे सुरु केले अन त्यातून उरणाऱ्या पैशातून मी माझी फी भरायचो”

आंब्यातून मिळणाऱ्या पैशातून १२ वी पर्यंतच शिक्षण तर पूर्ण झाल पण पुढे होते ग्रैजुएशन !! आता यासाठी अजून पैसे लागनर होते. नगरकोइलमधल्या हिंदू महाविद्यालयात त्यांना BSc Math मध्ये प्रवेश घेतला. यावेळी पहिल्यांदा सिवन यांनी चप्पल घातली, याअगोदर चपलीवर पैसे खर्च करण्याइतकी सुद्धा त्यांची आर्थिक ऐपत नवती. सिवन त्यांच्या परिवारातले पहिले ग्रैजुएट बनले तेही गणितात 100 पैकी 100 मार्क घेऊन.

आता त्यांची गणिताबरोबर विज्ञानात सुद्धा रुची वाढायला लागली म्हणून त्यांनी एमआईटी (मद्रास इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी) मध्ये प्रवेश घेतला अन त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली मग त्यांनी एरोऩॉटिकल इंजीनियरिंग मध्ये बीटेक केले.

त्यानंतर सिवन यांनी एयरोस्पेस इंजीनियरिंग मध्ये बैंगलोर के इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस मधून मास्टर्स केले. यानंतर त्यांची ISRO मधील नोकरी सुरु झाली. त्यांना पहिलाच काम PSLV बनवण्याच्या टीम मध्ये मिळाल. त्यावेळी भारत PSLV म्हणजे पोलर सेटेलाइट लॉन्च वेहीकल यावर काम करत होता अन भारताचे बहुतांश उपग्रह याच Vehicle द्वारे अंतराळात सोडले गेलेलं आहेत.

के सिवन यांचा ‘सितारा’ चमकला

के सिवन यांनी एक नवीन software बनवले जे rocket ला त्याच्या कक्षेत स्थिर करण्यामध्ये मदत करायचं, नाव होते सितारा. हे खूप जास्त यशस्वी झाला अन सगळीकडे याची चर्चा व्हायला लागली. हा तो काळ होता जेव्हा ISRO ने PSLV वरून GSLV या तंत्रज्ञानावर प्रगती केली होती.

पहिल्यांदा 18 अप्रैल, 2001 ला GSLV ची टेस्टिंग केली गेली, पण अपयश आल, ज्या जागेवर पोहचायचं होत तिथे हे rocket पोहचलेच नाही. त्यानंतर हे काम सिवन यांना दिले गेले अन त्यांनी ते लीलया करूनसुद्धा दाखवलं

ISRO पर्यंतचा प्रवास

यानंतर सिवन यांनी एका दुसऱ्या प्रोजेक्टवर काम सुरु केले, तुम्ही रियूजेबल लॉन्च वीकल हे नाव कधी ऐकले आहे का ? हे अस rocket आहे जे उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थिर केल्यावर पुन्हा परत येते.

“भारतीय अंतराळ हे सर्वात कमी खर्चात उपग्रह निर्माण करून त्याला अंतराळात सोडण्याबद्दल जगात नावाजलेले आहे, अन या reusable vehicle मुळे अंतरीक्ष मोहिमांचा खर्च खूप कमी होणार आहे”

याच दरम्यान सिवन यांनी एयरोस्पेस इंजीनियरिंग मध्ये आईआईटी बॉम्बे मधून PhD मिळवली, अन त्यांना या vehicle मध्ये लागणाऱ्या इंधन विभागाचा प्रमुख बनवण्यात आले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे प्रमुख बनवण्यात आले होते. २०१४ मध्ये ते इस्रो चे प्रमुख झाले.

सिवन यांचा प्रवास वाचल्यानंतर लक्षात येते कि या माणसाने किती कठीण परिस्थितीत मार्ग काढलेला आहे, अन हार मानलेली नाही. आयुष्याने त्यांच्या डोळ्यात अनेकदा अश्रू आणले पण या अवलियाने प्रत्येक अश्रूंचा मोती बनवलं काल त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू हे नव्या यशाची ग्वाही आहेत हे मात्र नक्की

admin

Leave a Comment

Recent Posts

‘दर्द काफी हे …’ सुशांतबरोबर शेवटपर्यंत काम केलेल्या संजनाने शेवटी शेयर केल्या भावना

सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने संपूर्ण हिंदी सेनेमा हादरला आहे. अचानक आपल्यातून निघून जाणं सर्वांसाठीच धक्कादायक…

1 week ago

वर्षा उसगावकर यांचा टॉपलेस फोटोशूटचा किस्सा !!

90 च्या दशकात आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री…

3 weeks ago

या देशाने सर्वात आधी हरवलं कोरोनाला.. शाळा, दुकाने, कॅफे, हॉटेल सगळ काही उघडले

दुनियेतले तब्बल २१० देश आता कोरोनासोबत लढत आहेत. पण आलेल्या बातमीनुसार जगात एक असा देश…

2 months ago

दिव्यंका त्रिपाठी मुलाखत – दिव्यांकाचा नवरा दाढी ठेवत नाही कारण ..

छोट्या पडद्यावरची सिरीयल 'ये है मोहब्बतें' मधील रमण भल्लाच्या पत्नीची भूमिका करणारी नटी दिव्यंका त्रिपाठी…

3 months ago

बॉलीवूड मध्ये प्रमुख खलनायक अन त्यांचे कुटुंब

बॉलीवुड मध्ये अनेक असे मोठे कलाकार आहेत ज्यांनी अनेक सुंदर अशा भूमिका साकारलेल्या आहेत. अनेक…

3 months ago

कोरोना व्हायरस आणि प्लास्मा उपचारपद्धती

कोरोनामुळे हैराण झालेल्या जगाला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. यामुळे कोरोनावरच्या उपचार पद्धतीत क्रांतिकारी बदल…

3 months ago