Spread the love

कलर्सवर येणारा हिंदी “बिग बॉस” ने अनेकांना वेडावले आहे, १० वर्ष झाली या मालिकेला सुरु होऊन पण अनेकांच्या मनावर या मालिकेचे अधिराज्य आहे. अन म्हणूनच कि काय कलर्स च्या मराठी वाहिनीवर आजपासून “बिग बॉस मराठी” अवतरतोय. या मराठी ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनला ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर धडाक्यात सुरूवात झाली. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असणाऱ्या महेश मांजरेकरांच्या भव्य अशा परफॉर्मन्सने या नव्याकोऱ्या शो ला सुरवात झाली. घरात नक्की कोण कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. मात्र याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला.

बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी 15 स्पर्धकांची निवड करण्यात आलीय. यामध्ये 8 महिला आणि 7 पुरूष स्पर्धकांचा समावेश आहे. हे सगळे स्पर्धक पुढचे 100 दिवस अनेक कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली या घरात एकत्र राहणार आहेत.

प्रत्येक स्पर्धकाने काहीतरी परफॉर्मन्स देत या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यासोबतच सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांने विचारलेल्या प्रश्नांना स्पर्धकांनी शिताफीने उत्तरं दिली. लोकांचं मन जिंकण्यासाठी हे स्पर्धक घरात दाखल झाले आहेत तरीही आत गेल्यावर मात्र विजयी होण्यासाठी त्यांना आपापसात लढावे लागणार हे बिग बॉस चे सत्य आहे.

एकमेकांशी जुळवून घेण्यासोबतच घरातील सगळ्या जबाबदाऱ्या आपापसात वाटून त्या पूर्ण करण्याची जबाबदारी असेल. एरवी मराठी सिनेसृष्टीत वावरताना एक मास्क चढवून हे सारे लोकांसमोर येतात, आता या मुखवट्यामागचे कलाकार पाहणे मजेदार ठरेल. 100 दिवस न आवडणाऱ्या …. भांडणाऱ्या लोकांसोबत एकत्र राहताना हा मुखवटा नक्की गळून पडून चेहरा समोर येण्याची शक्यता आहे अन हाच या एपिसोड चा “कि पोईन्त” आहे, अन यामुळेच इतके दिवस हा कार्यक्रम लोकप्रियतेची शिखरे गाठतोय.

‘मराठी बिग बॉस’च्या घराला एखाद्या राजेशाही वाड्याप्रमाणे सजवण्यात आल आहे. घराची अंतर्गत सजावटही अत्यंत रंगीत आहे. घराच्या बाहेर स्विमींगपूल, बसण्यासाठी खास खुर्च्या, सुंदर हिरवळ अन मराठी परंपरेला साजेसे तुळशी वृंदावनही ठेवण्यात आलंय. घराच्या भिंती वारली पेंटींग्जनी सजवण्यात आल्यात. किचनमध्ये नव्या भांड्यांसह, गॅस, फ्रिज आणि अनेक सोयीसुविधा देण्यात आल्यात.

‘मराठी बिग बॉस’चा ग्रँण्ड ओपनिंग झाल्यानंतर आता खरा खेळ सुरू होणारे. हा शो यापूर्वी हिंदीसह बंगाली, तेलगु, तामिळ, कन्नड अशा प्रादेशिक भाषांमध्ये यशस्वी ठरलाय. त्यामुळे ‘मराठी बिग बॉस’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो याचीही उत्सुकता आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता आणि शनिवार आणि रविवार रात्री 9. 00 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित करण्यात येईल.

मराठी बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक –

1) रेशम टिपणीस

2) विनीत बोंडे

3) आत्साद काळे

4) जुई गडकरी

5) अनिल थत्ते

6) स्मिता गोंदकर

7) आरती सोळंकी

8) भूषण कडू

9) उषा नाडकर्णी

10) मेघा धाडे

11) सई लोकूर

12) पुष्कर जोग

13) ऋतुजा धर्माधिकारी

14) सुशांत शेलार

15) राजेश श्रृंगारपुरे