Spread the love

ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणे हे बहुदा प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असेल. अन या स्वप्नाच्या मागे धावण्यात एखादा खेळाडू आपले संपूर्ण आयुष्य घालवतो. तुम्ही खुपदा पहिले असेल कि जिंकल्यानंतर पोडीयमवर उभे राहून खेळाडू आपल्या पदकाचा दातांनी चावा घेत असतो. तुम्हाला माहितीये का कि “खेळाडू आपल्या पदकाचा चावा का घेतो??” नाही ना …!! बहुतांश लोकांनाहि हे माहिती नाहीये. चला व्हायरल महाराष्ट्र आजच्या लेखात तुम्हाला सांगणार आहे याविषयी … अशाच मजेदार माहितीसाठी आपले पेज लवकर लाईक करा.

जिंकल्यानंतर पदकांचा असा चावा घेण्याची परंपरा हि अथेन्स ऑलिम्पिक पासून सुरु झालीय, अन हि परंपरा आजही चालूये. पण मजेदार गोष्ट अशी कि १९१२ च्या स्टॉकहोम ओलंपिकमध्ये हि परंपरा बंद झाली होती, यामागचे कारण असे कि स्टोकहोम ऑलिम्पिकमध्ये शेवटच्या वेळी खेळाडूंना अस्सल सोन्याचे मेडल दिले होते. अन अस सांगितले जाते कि खेळाडू पदकाचा चावा घेतात कारण पदक अस्सल सोन्याच आहे कि नाही हे कळावे म्हणून… आहे कि नाही मजेदार गोष्ट. नंतर पुन्हा हि परंपरा सुरु झाली ती आजतागायत चालू आहे.

या संबंधात इंटरनेशनल सोसाइटी ऑफ़ ओलंपिक हिस्‍टोरियन चे प्रेसीडेंट डेविड यांचे म्हणणे आहे कि, “हा पोज देण्याचा प्राचीन प्रकार आहे याशिवाय दुसर काहीही नाही. जो आता एकप्रकारच आयकॉन बनलाय”

ओलंपिक मध्ये खेळाडूंना जे गोल्ड मेडल दिले जाते ते 494 ग्राम सिल्वर व  6 ग्राम सोण्याचे बनलेले असते याचाच अर्थ असा कि ज्याला आपण सुवर्णपदक म्हणतो त्यात सुवर्ण फक्त नावाला असते, फक्त ६ ग्राम.

पूर्वीपासून सांगितले जाते के सोने हा असा धातू आहे ज्याची परीक्षा चावल्यानंतरच कळते. अन प्राचीन काळापासून सोन्याची अशी परीक्षा विश्वाच्या काण्याकोपऱ्यात होते. मुलायम असल्या कारणाने सोन्यावर लगेच दातांचे निशाण पडतात.

.

२०१० मध्ये एक मजेदार घटना घडली एथलीट जर्मन लुगर मोलर हे कास्यपदक चावत होते अन या-दरम्यान चक्क त्यांचा दातच पडला. ब्राझील मध्ये साक्षी मलिकने सुद्धा मेडल जिंकल्यावर अशीच पोज दिली होती.