Interesting

रस्त्यावरील निरनिराळ्या रंगांचे दगड तुम्हाला काय सांगतात … माहितीये ..?? मग वाचा

Written by admin

रस्त्याने भटकंती करताना बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला किलोमीटर अंतराची संख्या सांगणारे दगड दिसतात. या दगडावरून प्रत्येक मार्गावरचे गाव, तेथील शहरे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारे साधारण अंतर याचा आपल्याला अंदाज येतो, पण तुम्हाला हे माहिती आहे का  कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या या दगडांच्या रंगाचा, तसेच हे दगड लावण्यामागे एक विशिष्ट अर्थ असतो.?? प्रत्येक रंगाच्या दगडाची काही वैशिष्ट्ये आहेत. व्हायरल महाराष्ट्र च्या लेखामध्ये पाहूया काय आहेत ही वैशिष्ट्ये…!!

१. पिवळा रंग

असा दगड दिसला म्हणजे तुम्ही हमखास एखाद्या मोठ्या रस्त्यावर असाल कारण या रस्त्यांची निर्मिती “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून” केलेली आहे अन ज्या रस्त्यांची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करते फक्त अशाच रस्त्यांवरील अंतर दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर केला जातो. सोबतच राष्ट्रीय महामार्गावरच पिवळ्या रंगाचे दगड हे दिशादर्शक म्हणून लावले जातात. असे रस्ते एक प्रदेशाला दूसऱ्या प्रदेशाला जोडण्याचे काम करत असून त्याची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जाते.

२. हिरवा रंग

हिरव्या रंगाचा दगड दिसला याचा अर्थ तुम्ही एका चांगल्या रस्त्यावर आहात पण तो राष्ट्रीय महामार्ग नाहीये साधारणतः राज्य महामार्गाच्या रस्त्यांवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिशा दाखवण्याचे काम हे हिरव्या रंगाचे दगड करतात. राज्यांतर्गत मोठ्या शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गाची देखभाल ही राज्य सरकारकडून करण्यात येते.

३. नारंगी रंग

भारतभर कुठेही प्रवासा करत असताना जर तुम्हाला नारंगी रंगाचे दगड दिसले तर हमखास समजून जायचे कि हा रस्ता एखाद्या छोट्या गावाला नेणारा आहे. कारण नारंगी दगडाचा अर्थ “पंतप्रधान ग्राम सडक योजने” च्या अंतर्गत या एखाद्या छोट्या गावाला जोडण्यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

४. निळा किंवा काळा रंग

असे दगड दिसले म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या शहराच्या अगदी जवळ आहात. या रंगांच्या अर्थ तुम्ही एखाद्या शहराच्या जवळ पोहचला आहात असा असतो. निळ्या किंवा काळ्या रंगाचे मैलाचे दगड असणारा रस्ता जिल्ह्याच्या अंतर्गत येतो अन याची निर्मिती स्थानिक पीडब्ल्यूडी खात्याकडून करण्यात आलेली असते.

About the author

admin

Leave a Comment

16 − 14 =