Spread the love

टीवी वरचा लोकप्रिय कार्यक्रम “भाबिजी घर पर हे” नेहमीच चर्चेत असतो, कधी तो अंगुरी भाभिच्या व्यक्तिरेखेमुळे तर कधी शिल्पा शिंदेने केलेल्या आरोपामुळे. पण थांबा …!! अंगुरी भाभीला तोडीस तोड नव्हे तर सव्वाशेर अशी अजून एक भाभी येतेय …झूमा भाभी…!!! पहिल्या लुकमध्ये तरी “झुमा भाभी” अंगुरी भाभीला टक्कर देताना दिसत आहे. अन या नव्या भाभिच्या रुपात दिसणार आहे भोजपुरी सिनेमाची नायिका मोनालिसा.

मोनालिसा बिग-बॉस चे सर्वाधिक चर्चित सीजन १० मधली कंटेंस्टन्त होती, (हे तेच सीजन ज्यामध्ये काम करणारा स्वामी ओम नावाचा एक भोंदू साधू त्याच्या विचित्र वागणुकीमुळे आज देशभरात मार खातोय). अंगुरी भाभी मुळे टीवी वर भाभी व्यक्तिरेखेची वाढलेली लोकप्रियता कॅश करण्यासाठी मोनालिसा येतेय. भोजपुरी सिनेमाची हि लोकप्रिय नायिका बंगाली वेब सीरीज ‘दुपुर ठाकुरपो’ मध्ये दिसणार आहे. या वेब सिरीजचे हे दुसरे सीजन आहे, मोनालिसाने आपल्या इन्स्टाग्राम वर यातले काही लुक share केलेले आहेत. अन सोबतच या सिरीजचा टीजर सुद्धा share केला आहे.

या टीजर वरून हे नक्की आहे कि मोनालिसा आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार आहे. या वेब सिरीजची गोष्ट खूप मजेदार आहे, एक रिपोर्टनुसार या सिरीजमध्ये काही युवक झुमा भाभीच्या पाठीमागे लट्टू झालेत अन तिला पटवण्याचा प्रयत्न करतायेत. “झुमा भाभी” च्या व्यक्तिरेखेत मोनालिसा अक्षरशः घायाळ करतीये. एका बोल्ड अन मादक भाभीची व्यक्तिरेखा तिने छान साकारलीय अस पहिल्या लुकवरून तरी वाटतंय.

मोनालिसा भोजपुरी फिल्ममधली एक हॉट एक्ट्रेस आहे जिने आपल्या हॉटनेसमुळे से यूपी अन बिहार च्या जनतेच्या मनावर अधिराज्य केलाय. मोनालिसा बिग बॉस 10 मध्ये कंटेस्टेंट राहिली आहे आणि भोजपुरी सिनेमामधले एक जाना-माना नाव आहे. मोनालिसा ने 100 पेक्षा अधिक भोजपुरी फिल्मस सोबतच हिंदी, बंगाली, उड़िया, कन्नड़, तमिल व तेलुगु फिल्मस मध्ये सुद्धा काम केल आहे.

गायक-एक्टर पवन सिंह सोबतची मोनालिसाची जोड़ी दर्शकांना खूप आवडली होती. प्रत्येक भोजपुरी प्रेक्षक मोनालिसाला ओळखतो. अन मोनालिसा फक्त भोजपुरीमधेच नाही तर बॉलीवुड, कन्नड़, तमिल और तेलगु सिनेमा मध्ये सुद्धा चांगलीच फेमस आहे. कोलकाता मधे जन्मलेल्या मोनालिसाचे खरे नाव ‘अंतरा विश्वास’ आहे पण फिल्मों मध्ये येण्यानंतर तिने ते ते बदलून मोनालिसा केले. मोनिलास बी ग्रेड फिल्मस मध्येसुद्धा काम कऋण चुकली आहे. सोबतच बॉलीवुडमध्ये अजय देवगन चा सिनेमा ‘सिंघम’ मधे सुद्धा तिचा एक रोल आहे. भोजपुरी फिल्म मधल्या या सुंदर एक्ट्रेस ला ‘झूमा भाभी’ च्या व्यक्तिरेखेत पाहणे खूपच मजेदार ठरणार आहे.

❤️??…. “O BOUDI SWAPNO SUNDARI”

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on