Breaking News
Home / Uncategorized / शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला

उस्मानाबादचे(धाराशिव) शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका माथेफिरूने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक कळंब येथे घटना घडलीय. कळंब तालुक्यात पडोळीमधील नायगाव येथे हा हल्ला झाला. शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ते गावात रस्त्यावरून चालत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान, पळून गेलेल्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केलीय.

LIVE : उस्मानाबाद : ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला

LIVE : उस्मानाबाद : ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला

Posted by TV9 Marathi on Tuesday, 15 October 2019

ओमराजे निंबाळकर हे पडोळी नायगाव येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. यावेळी गर्दीतून आलेल्या एका तरुणाने हात मिळवत त्यांच्या पोटावर दुसऱ्या हाताने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत ओमराजे यांनी दुसरा हात मध्ये घालत हा चाकू हल्ला अडवला. यानंतर हल्ला करणारा तरुण पळून गेला. ओमराजेंच्या हातावर चाकूचा वार बसला या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

हल्ला करणारा तरुण हा कोण होता हे माहिती नाही. या घटनेने आपल्यालाही धक्का बसला आहे. आपल्या वडिलांचीही अशाच प्रकारे हत्या झालीय. मात्र आपल्यावर झालेल्या हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. मी सुखरुप आहे. पण हा हल्ला कशामुळे केला गेला. यामागे कोण आहे. याची आपल्याला कल्पना नाही. गेल्या दोन दिवसांपासून प्रचारासाठी फिरतोय. काही प्रचारसंभांमध्ये जाणूनबुजून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला, असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हल्ल्यांच्या घटनेनंतर सांगितलं.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Kalpita Patil Jalgaon

सर्वात तरुण सरपंचाला मिळणार विधानसभेचं तिकीट ?

कुणी कितीही महिला सबलीकरण म्हणत असले तरी सर्वसामान्यपणे राजकारण हा पुरुषांचा आखाडा समजला जातो. महिला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − ten =