Notes For Various Government Exams – Current Event/ Newspaper Articles / Subject Material

NOTES Various Government Exams

दीपक मिश्रा देशाचे बनणार ४५ वे सरन्यायाधीश

भारताचे ४४ वे सरन्यायाधीश जगदीश खेहर निवृत्त होत आहेत व ओडीसा चे दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

२०१०-११ साली सुरु झालेल्या या योजनेनुसार गरोदर महिलांना त्यांच्या व त्यांच्या बाळांसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळते

इंदिरा आवास योजना

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना गृहबांधणीसाठी मोफत/अनुदान स्वरुपात सरकारव्दारे निश्चित धनराशी उपलब्ध करणे.

अहमदाबाद हे भारतातील पहिले जागतिक वारसा शहर

दिनांक – ३१ जुलै २०१७

UNESCO (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) युनेस्कोने नरेंद्र मोदि यांच्या अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणजे जागतिक वारसा शहर म्हणून जाहीर केले आहे. युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेज सिटी हा दर्जा मिळवणारे अहमदाबाद भारतातील पहिले शहर ठरले आहे. पोलॅण्डच्या क्रोकोव शहरात झालेल्या युनेस्कोच्या 41व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.

अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस बिल गेट्स यांना मागे टाकून बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

कशी करायची लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 ची तयारी- संदर्भग्रंथ व सूचना

दिनांक – २८ जुलै २०१७

कारगिल विजय दिवस – गोष्ट भारताच्या पहिल्या अपंग कमांडर ची

दिनांक २६ जुलै २०१७

मेजर जनरल इयान कार्डोझो हे नाव ऐकल कि पहिला प्रश्न मनात येईल कि कोणाच नाव हे? भारतीय आहेत का? कारण आपली भारतीय असण्याची व्याख्या आधी आडनावा वरून सुरु होते. आपल्याकडे नको त्या लोकांना हिरो बनवण्याची घाई असते. १० शतक मारणाऱ्या खेळाडू वर शाळेत धडा येतो किंवा १०० चित्रपट करणारा हिरो मिलेनियम सुपरस्टार बनतो. पण आपल्या जिद्दी पुढ पूर्ण लेख वाचा(Read More…)

इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचे निधन 

दिनांक- २५ जुलै २०१७

इस्रोचे माजी अध्यक्ष प्रोफेसर उडुपी रामचंद्र राव (यू.आर. राव) यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षाचे होते.

प्रोफेसर राव यांनी 1972 साली भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदारी घेतली होती. लेख पूर्ण वाचा(Rad More…)

लोणार सरोवर एक रहस्य…!

दिनांक २४ जुलै २०१७

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे ६ मेगा टन शक्तीचा स्फोट झाला. आपल्याला ज्ञात असलेल्या हिरोशिमा-नागासाकी इथली शक्ती ०.२५ मेगा टन इतकीच होती. म्हणजे लोणार इथली धडक पूर्ण भूतलावर त्यावेळी जाणवली असेल लेख पूर्ण वाचा(Read More…)

काय आहे राफेल विमान खरेदी करार ?

दिनांक- २३ जुलै २०१७

फ्रान्सकडून भारत 36 राफेल विमाने विकत घेणार असून मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात याविषयी दोन्ही देशांदरम्यान 7.87 अब्ज युरोंचा करार झालाय. राफेल विमान  अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून अत्याधुनिक क्षेपणास्त्र सोबत नेण्याची क्षमता त्यात जोडण्यात आली आहे. यामुळे भारतीय हवाईदलाला मोठे बळ मिळेल. दोन्ही देशांमधील करारानुसार लढाऊ विमानाचा पुरवठा 36 महिन्यात सुरू होणार असून 67 महिन्यांमध्ये (जवळपास साडेपाच वर्षे) कराराची पूर्तता केली जाईल.

▪️वयवहाराला लागली 9 वर्षे
राफेल व्यवहाराला भारतीय हवाईदलाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार मानले जात आहे. करारावर स्वाक्षरी करण्यावेळी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांसह दसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील उपस्थित होते. भारताच्या वतीने तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वाक्षरी केली होती. 2007 साली या व्यवहारासाठी बोलणी सुरू झाली होती. भारताने राफेलला अमेरिकेची कंपनी लॉकहीड आणि रशियन मिग विमानांच्या तुलनेत प्राधान्य दिले होते.

India New Fighter Plane Rafeal

India New Fighter Plane Rafeal

▪️राफेलची गरज
भारतीय हवाईदलाकडे सध्या 44 फायटर स्क्वॉड्रन असले तरी जुन्या विमानांना हटविण्यात येणार असल्याने प्रत्यक्षात 34 स्क्वॉड्रनच कार्यान्वित आहेत. भारताला लढाऊ विमानांची आत्यंतिक गरज असून 1996 साली हवाईदलाला सुखोई 30 एमकेआय विमान मिळाले होते. जुनी ठरलेली मिग-21 आणि मिग-27 विमानांना ताफ्यातून हटविले जात आहे.

▪️राफेलची वैशिष्टय़े
राफेल या प्रेंच शब्दाचा अर्थ वादळ असा होतो. राफेल दोन इंजिनयुक्त मल्टीरोल लढाऊ विमान आहे. याचा वेग 2250-2500 किलोमीटर प्रतितासापर्यंत असून इंधनक्षमता 4700 लीटर एवढी प्रचंड आहे. हे विमान विमानवाहू नौकेवरूनही उड्डाण भरू शकते. ब्राह्मोस सारख्या अण्वस्त्रवाहून नेणारे क्षेपणास्त्र सोबत नेण्याची यात क्षमता आहे. हवेत देखील इंधन भरण्याच्या सुविधेसह हे विमान सलग 10 तासांपर्यंत उड्डाण भरू शकते. फ्रान्स सरकारने 4 युरोपीय देशांना सोबत घेत याची निर्मिती सुरू केली होती. नंतर उर्वरित 3 देश या प्रकल्पातून हटल्याने फ्रान्सने स्वबळावर याची निर्मिती केली.

tags-Notes various government exams, mpsc notes

प्रधानमंत्री व्यय वंदना योजना

दिनांक- २३ जुलै २०१७

केंद्र सरकार ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री व्यय वंदना योजना’ नावाने एक पेन्शन योजना आणत आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ही योजना सादर केली. एलआयसीमार्फत ही पेन्शन योजना ऑफलाइन किंवा ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येईल.

या योजनेअंतर्गत कमाल ६० हजार रूपये वार्षिक पेन्शन म्हणजेच दरमहा ५ हजार रूपये मिळतील. ६० हजार पेन्शनसाठी एकरकमी ७,२२,८९० रूपये जमा करावे लागतील. या योजनेअंतर्गत किमान पेन्शन वार्षिक १२ हजार म्हणजे दरमहा १ हजार रूपये मिळतील. यासाठी एकरकमी १,४४,५७८ रूपये जमा करून पॉलिसी खरेदी करावी लागेल. ही योजना १० वर्षांसाठी असेल. म्हणजे एकदा पेन्शन योजना खरेदी केल्यानंतर पुढील १० वर्षांपर्यंत पेन्शन घेता येऊ शकते. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीला या योजनेत भाग घेता येऊ शकतो.

जर पेन्शन पॉलिसी नियमानुसार १० वर्ष पूर्ण झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती हयात असेल तर त्याला पेन्शन रकमेबरोबर अंतिम पेन्शन हप्त्याची रक्कमही मिळेल. पेन्शनरचा पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाला तर त्याची पेन्शन प्राइस लाभार्थ्याला मिळेल. पेन्शन योजनेअंतर्गत मासिक, तिमाही, सहामाही पेन्शन घेता येऊ शकेल.

जर पेन्शनरला स्वत:ला किंवा त्याच्या पत्नीला गंभीर आजार जडला तर तो या योजनेतून बाहेर पडू शकतो. अशावेळी त्याला ही योजना खरेदी करतानाच्या किमतीच्या ९८ टक्के रक्कम परत मिळेल. ६० वर्षांहून अधिक वयाचे नागरिक ही पेन्शन योजना ३ मे २०१८ पर्यंत खरेदी करू शकतो. या योजनेला जीएसटीत सूट देण्यात आली आहे. पेन्शन घेतल्यानंतर ३ वर्षांनंतर गरज भासल्यास खरेदी मूल्याच्या ७५ टक्केपर्यंत कर्ज घेण्याची परवानगी देण्यात येईल.

▪️योजना नेमकी काय?
योजनेत सहभागी झाल्यानंतर साठ वर्षे वयाची व्यक्ती पुढील दहा वर्षे जिवंत राहिल्यास पेन्शन रकमेबरोबरच योजनेतील एकूण रक्कम दरमहा हप्त्यांमध्ये परत मिळेल. योजना पूर्ण होण्यापूर्वीच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास उर्वरित रक्कम पेन्शनच्या किमतीसह वारसदाराकडे सुपूर्त केली जाईल. योजनेंतर्गत दरमहा, दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने पेन्शन दिले जाणार आहे. पेन्शनर किंवा त्यांची वृद्ध पत्नी गंभीर आजारी पडल्यास संबंधित व्यक्ती योजनेतून मुदतीपूर्वी रक्कम कधीही काढू शकतो. मात्र, त्या वेळी त्याला खरेदी किमतीच्या ९८ टक्के रक्कम परत मिळेल. साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना या योजनेची खरेदी ३ मे २०१८ पर्यंत करता येणार आहे. योजनेला जीएसटीतून मुक्त करण्यात आले आहे. पेन्शन घेतल्यानंतर तीन वर्षांनी कोणत्याही अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी खरेदी मूल्याच्या ७५ टक्क्यांइतकी रक्कम कर्जाऊ मिळण्याची सोयही करण्यात आली आहे.

tags- Notes various Government Exams, MPSC Notes

राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षण- 4 चा अहवाल

22 जुलै 2017

2005-2006 च्या माहितीवर आधारित युनिसेफच्या अहवालांतर्गत, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण- 4 च्या अहवालानुसार, कुपोषित बालकांच्या क्रमवारीत भारत दहाव्या क्रमाकांवर तर वाढ खुंटलेल्या बालकांच्या क्रमवारीत 17 व्या स्थानी आहे. मात्र राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, 2015-16 च्या माहितीच्या आधारे कुपोषित बालकांचे प्रमाण 42.5% वरुन 35.7% तर वाढ खुंटलेल्या बालकांचे प्रमाण 48 % वरुन 38.4 % इतके कमी झाले आहे.

कुपोषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार अंगणवाडी सेवा आणि किशोरवयीन मुलींसाठी विविध योजना राबवत आहे.

Tags- Notes Various Government Exams, MPSC Notes

ऑस्कर पुरस्कार जाहिर 

१३ जुलै २०१७

ऑस्कर पुरस्काराचे यंदाचे ८९ वे वर्ष होते. यंदाच्या पुरस्कारात सर्वाधिक ६ पुरस्कार [ ला ला लँड ] या चित्रपटाला मिळाले तरी सर्वोत्कृष्ट चित्रपट [ मुनलाइट ] या चित्रपटाला मिळाला.(मजेची गोष्ट अशी कि सुरवातीला चुकून “ला ला लँड” चे नाव पुकारले गेले होते)

पुरस्कार विजेते –
सर्वोत्कृष्ट चित्रपट – मूनलाईट
सर्वोत्कृष्ट अभिनेता – केसी अॅफ्लेक (मँचेस्टर माय द सी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एमा स्टोन (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – डॅमियन चॅझेली (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट पटकथा – बॅरी जेन्किन्स (मूनलाईट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मेहर्शला अली (मूनलाईट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – वायोला डेव्हिस (फेन्सेस)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – लीनस सँडग्रेन (ला ला लँड)
प्रॉडक्शन डिझाईन – ला ला लँड
सर्वोत्कृष्ट गीत – सिटी ऑफ स्टार्स (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट संगीत – जस्टीन हुरवित्झ (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले – केनिथ लॉनेरगन (मॅँचेस्टर बाय द सी)
सर्वोत्कृष्ट व्हिज्युएल इफेक्ट्स – द जंगलबुक
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्टफिल्म – पायपर
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचरफिल्म – झुटोपिया
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट – द सेल्समन (इराण)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – ओ.जे.: मेड इन अमेरिका
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – कॉलिन एटवूड (फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम)
मेकअप आणि केशरचना – सुसाईट स्क्वॉड
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग – सलवेन बेलमेर (अरायव्हल)
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग – हॅक्सॉ रिज
सर्वोत्कृष्ट संकलन – जॉन गिल्बर्ट (हॅक्सॉ रिज)
सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्टफिल्म – सिंग
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी (शॉर्ट सब्जेक्ट) – द व्हाईट हेल्मेट्सहेल्मेट्

tags- Notes various government exam, MPSC Notes