Spread the love

तुम्हाला जेसिका लाल हत्याकांड आठवतंय…?? हो तेच हत्याकांड ज्यावर “नो वन किलड जेसिका” नावाचा एक चित्रपटसुद्धा येऊन गेलाय. या जेसिका लाल हत्याकांडात एका मुलीला गोळी मारण्यात आली होती कारण तिने ग्राहकाला बार बंद होतंय अस सांगण्याची हिम्मत केली होती. अशीच एक घटना पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात घडली आहे. एका प्रसिद्ध गायिकेने आपण फर्माईश केलेले गाणे न म्हटल्याने एका युवकाने तब्बल लागोपाठ ३ गोळ्या तिला घातल्या.

पाकिस्तान हा देशच मुळात आतंकवादी प्रवृत्तीने भरलेला आहे. इथे स्वताच्याच देशात दहशत माजवायलासुद्धा लोक कमी नाही करत. इथे जवळपास प्रत्येकाजवळच बंदूक आहे… देशी कट्टे आहेत. या पाकिस्तानमध्ये एका सिंधी गायिकेला फक्त यासाठी गोळी मारली गेली कि तिने एक गाणे गायले नाही. कारण गर्भवती असल्याकारणाने तिला शारीरिक अडचणी होत्या.

हि पूर्ण गोष्ट एका विडीयोमध्ये कैद झालीय, अन सोशल मिडीयावर व्हायरल होतेय. २४ वर्षाची समीना कराचीजवळच्या कांगा नावाच्या गावी गाणे म्हणायला गेली होती. सामिणाचा कार्यक्रम इथे ऐन भरात होता. तारिक जटोई नावचा एक माणूससुद्धा या गर्दीत होता.

तारिकने समीनाला आपल्या आवडीचे गाणे म्हणायला सांगितले. सामिनाने ते गाणे म्हणायलाही सुरवात केली, पण तारीखने तिला उभे राहून गायला सांगितले. समीना यावर उभी सुद्धा राहिली पण गर्भवती असल्या कारणाने फारवेळ उभे राहता न आल्याने ती बसली तेव्हा तारीखने ३ गोळ्या तिच्यावर झाडल्या.

या घटनेचा विडीयो एका मानवधिकार कार्यकर्त्याने सोशल मिडीयावर टाकला आहे. सांगितले जाते कि आरोपी हा नशेत होता. अन त्याने गोळी मारण्याअधी सामिनाला खूप पारेषण सुद्धा केले होते. याट चांगली गोष्ट एकच आहे कि पोलिसांनी त्याला जेलमध्ये बंद केले आहे.

समीना हि ६ महिन्यांची गर्भवती होती, अन अशीही गोष्ट समोर येतेय कि आरोपीकडून सामिनाच्या नवऱ्यावर केस मागे घेण्यासंबंधी दबाव येतोय. तिच्या नवऱ्याने २ हत्येंची केस आरोपीविरुद्ध केली आहे. पाकिस्तानमध्ये मुळातच कलाकारांसोबत खूप खराब व्यवहार केला जातो. कित्येक पाकिस्तानी कलाकारांनी भारतात हि गोष्ट बोलून दाखवली आहे.