अबब !! या उमेदवाराइतकी संपत्ती इतर कुणाचीही नाही

भाजपने यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचे तिकिटे कापले, त्यापैकीच एक होते माजी मंत्री प्रकाश मेहता. माजी मंत्री प्रकाश मेहतांना डावलून त्यामानाने नवख्या उमेदवाराला तिकीट दिले गेले. मेहतांच्या जागेवर वर्णी लागलेले विद्यमान नगरसेवक पराग शहा यांची संपत्ती ऐकून तुम्ही अवाक व्हाल. पराग मेहता हे कदाचित या विधानसभेतील सर्वात श्रीमंत उमेदवार असतील कारण त्यांची संपत्ती कि 500 कोटींपेक्षाही जास्त असल्याचे सांगितले जाते.

घाटकोपर पूर्व मतदारसंघ हा गेल्या अनेक निवडणुकांपासून प्रकाश मेहता यांचा गड मानला जातो. पण यावेळी मेहतांच्या गडावर शहा यांचे निशाण फडकले आहे, अन पक्षानेच पराग शहा यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे. पराग शहा यांना तिकीट दिल्यामुळे घाटकोपर पूर्वेतले स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत अन त्यांची नाराजी सार्वजनिकपणे समोर येत आहे.

प्रकाश मेहता यांना तिकीट न दिल्यामुळे मेहतांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे अन त्याचाच परिणाम म्हणून घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते तेव्हा त्यांच्या गाडीची प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

पराग शहा यांची संपत्ती अशाप्रकारे आहे

रोख रक्कम :२ लाख ९ हजार. बँकेतील ठेव ५४ लाख ३५ हजार ४६२
BONDS अन रोख्यातली गुंतवणूक: २ कोटी ७० लाख ६६ हजार ७३९
लिस्टेड शेअर्स: १९९ कोटी ९४ लाख २२ हजार १९५
अनलिस्टेड शेअर्स : २ कोटी २१ लाख ६६ हजार ५५९
PF खाते : ४८ लाख ७८ हजार ३७२
इन्सुरंस मधील गुंतवणूक : ४ कोटी २५ लाख ९ हजार ६५५\
वाहन स्कोडा रॅपिड : ८ लाख ९८ हजार, चांदी १ लाख ७ हजार ८१९
सोन व दागिने : ६३ लाख १४ हजार १५६, हिरे ५९ लाख ३ हजार ९४२
जंगम मालमत्ता : २३९ कोटी २४ लाख १९ हजार १६८ रूपये
स्थावर मालमत्ता २० कोटी ६८ लाख ४२ हजार ६०१ रूपये

अशी एकूण ५४३ कोटी ७६ लाखांची मालमत्ता पराग शहा यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

admin

Leave a Comment

Recent Posts

सैफ आणि अमृताच्या लग्नात दहा वर्षाची करिना बोलली होती असे काही… ऐकूण चकित व्हाल…!

सैफ अली खान कुणाला नाही माहित बॉलीवूडमधील नवाब आणि तैमुर चा बाप, सर्वांनाच माहिती आहे.…

4 days ago

अयोध्येच्या राममंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात;संभाजी भिडे यांची मागणी

सांगली- अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन ५ ऑगस्ट ला होणार आहे अन अयोध्येतल्या या ऐतिहासिक प्रसंगासाठी…

5 days ago

अनोखी ओवाळणी, दादा परत ये भावनेला साद घालत नक्षली भावाने केले आत्मसमर्पण

नवी दिल्ली – एका बहिणीसाठी तिचा भाऊ वाईट मार्गावरुन चांगल्या वाटेवर येत असेल अन एका…

5 days ago

किस्से मैत्रीचे – लग्नात भेटले, मैत्री झाली नी बलाढ्य फायनान्स कंपनीची स्थापना

महिंद्रा ग्रुप कुणाला माहिती नाही ? अन आनंद महिंद्रा हे नावही गावागावात पोचलेले आहे. त्याप्रमाणे…

6 days ago

किस्से मैत्रीचे – शतकांची नी वडापावाची भूक

आज मित्रता दिवस, तुमच्या आमच्या भाषेत म्हणायचं झालं तर फ्रेंडशिप डे... या पार्श्वभूमीवर व्हायरल महाराष्ट्र…

6 days ago

मोठी बातमी : विराट कोहलीला अटक करा, मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल

हैद्राबाद : ‘ऑनलाइन जुगारा’ला प्रोत्साहन दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीविरोधात मद्रास उच्च न्यायालयात…

7 days ago