“भौंकते कुत्ता” अस राजीव गांधी म्हणाले, तेव्हा जेठमलानींनी दिल हे उत्तर ! गप्प झाले राजीव

राम जेठमलानी, कदाचित देशातले सर्वात महागडे वकील अन तेव्हडेच निष्णात. वकीलीसोबत नेहमीच वादाच्या जवळपास असणारे हे व्यक्तिमत्व. 95 वर्षाच्या जेठमलानी यांनी आज सकाळी ८ सप्टेंबर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पंतप्रधानांसह संपूर्ण देशभरातून अनेक नेत्यांनी अन लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. व्हायरल महाराष्ट्र च्या टीमने जेठमलानी यांच्या जीवनीची थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय.

गोष्ट सुरु होते जेव्हा भारत अखंड हिंदुस्तान होता. अशा अखंड भारतातील सिंध प्रांतातल्या शिकारपूर गावामध्ये १४ सप्टेंबर १९२३ ला जेठमलानी कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्यावेळी चुकूनही कुणी विचार केला असेल कि हे लहानसे मुल भारताच्या राजकारणात अनेक वादळ आणीन. अन अनेकदा सत्तेचे डोलारे हलवेन.

वडील वाकीन त्यामुळे घरची परिस्थिती व्यवस्थित असल्याने त्यांनी सुरवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूल मध्ये घेतले. राम जेठमलानी यांना पहिल्यापासून वकिलीचा वारसा लाभला होता कारण त्यांचे आजोबा अन वडील दोघेही वकील होते. अन म्हणूनच लहानपणापासून त्यांना वकिलीचे बाळकडू घरातच मिळाले.

पहिली केस लढली, जिंकली … फी फक्त 1 रुपया !!

अवघ्या १७ व्या वर्षी राम यांनी वकिली पूर्ण केली. मजेची गोष्ट अशी कि त्या काली वकीली पूर्ण करण्याचे वाय २१ वर्ष होते पण राम यांच्या बुद्धीमत्तेमुळे त्यांना विशेष सवलत देण्यात आली अन म्हणूनच अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी आपल्या वकिलीच्या व्यवसायास सुरवात केली. पहिली केस लढवण्यासाठी त्यांना कुठे दूर जावे लागले नाही त्यांच्या घरमालकासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली केस लढली अन जिंकली. या केससाठी त्यांनी अवघी 1 रुपया इतकी फी घेतली (१९४० च्या सुमारास तशी १ रुपया ही सुद्धा कमी रक्कम नसावी)

फाळणी होत होती, अन जेठमलानी दुसरे लग्न करत होते !!

मध्यंतरी जेठमलानी त्यांनी TOI ला मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी सांगितलं कि त्यांना शाळेमध्ये डॉली नावाच्या एका मुलीसोबत प्रेम झाले अन बहुदा प्रत्येक प्रेमवीरासारखे त्यांचे लग्न मात्र दुसऱ्याच कुणासोबत तरी झाले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दुर्गा, त्यावेळी बहुपत्नी प्रतिबंध असा काही कायदा नवता तेव्हा 14 ऑगस्ट १९४७ ला जेव्हा भारताची फाळणी होत होती तेव्हा जेठमलानी यांचे दुसरे लग्न लागत होते.

फाळणीनंतर 1948 साली ते भारतात आले, त्यावेळच्या जवळपास सगळ्याच निर्वासीतांप्रमाने करोडोची संपत्ती पाकिस्तानात सोडून ते मुंबईला पोहचले. सोबत होती फक्त अक्कल अन वकिलीची डिग्री. मुंबईच्या रीफ्युजी कॅम्पमध्ये राहत त्यांनी वकिली सुरु केली. आपल्या अक्कलहुशारीवर त्यांनी काही वर्षात स्वतःचे वकील चेंबरसुद्धा बनवून घेतले या चेंबरची किंमत होती 600 रुपये.

ram jethmalani in marathi

१९७१, महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचा बोलबाला सुरु झाला होता, अशावेळी राम जेठमलानी लोकसभेच्या रिंगणात उतरले. शिवसेना अन जनसंघ दोघांचाही पाठींबा त्यांनी मिळवला पण इंदिरा गांधींच्या दिव्यवलयी नेतृत्वासमोर त्यांचा काही ठिकाना लागला नाही अन ते त्यांची पहिली लोकसभा हरले.

आणीबाणी अन कॅनडा पलायन

लोकसभा जरी हरले असले तरी राजकारणात त्यांनी आपला चंचुप्रवेश केला होता. वकिलांच्या दृष्टीने महत्वाची असणाऱ्या बार असोसिएशन ची चेयरमनची पोस्ट मात्र त्यांनी जिंकली. अशातच इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली, जेठमलानी यांनी सरकारवर परखड टीका केली. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध वारेंत काढला म्हणून ते १० महिने कॅनडामध्ये जाऊन राहिले अन जेव्हा आणीबाणी संपली तेव्हाच परत आले.

आणीबाणी अन प्रामुख्याने नसबंदीच्या विरोधातला जनतेत आक्रोश होता याचा फायदा त्यांना झाला 1977 अन 1980 अशा लागोपाठ दोन वेळा त्यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय संपादित केला. पण सुनील दत्त अन इंदिरा गांधींच्या हत्येमुळे आलेली सहानभूतीची लाट यामुळे त्यांना १९८५ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला पण १९८८ मध्ये ते राज्यसभेत पोचलेच.

बोफोर्स, राजीव गांधी अन जेठमलानींचे ४०० प्रश्न !!

1987 मध्ये जेठमलानी यांनी बोफोर्स चा मुडदा उचलला अन राजीव गांधी यांना तब्बल ४०० प्रश्न विचारले सोबतच त्यांना आव्हान दिले कि राजीव गांधींनी माझ्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करून दाखवावा.

“प्रधानमंत्री अन त्यांच्या मित्रांनी ५० कोटींची लाच घेतली आहे, मला त्या सगळ्यांना क्रॉस-एग्जामिन करायला आवडेल”

सरळसरळ हल्ला हा राजीव गांधी किंवा प्रस्थापित राजकारण्यांना नवी गोष्ट होती. अन यामुळे राजीव गांधींची मर्यादा सुटली अन त्यांनी पातळी सोडत म्हटले कि
“प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही”.

पण थांबतील ते जेठमलानी कुठले, त्यांनी पलटवार
“मला कुत्रे म्हटले म्हणून मी अपमानीत झालो नाही, कुत्र कधी खोट नाही बोलत अन तेव्हाच भुंकते जेव्हा चोराला पाहते. लोकशाहीचे रक्षण करणारा एक कुत्रा असल्याबद्दल मला अभिमान आहे”

यावर राजीव गांधी निरुउत्तर झाले.

जेठमलानी एक राजकारणी !!

1996 व 1999 मध्ये राम जेठमलानी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात मात्री पानले. १९९६ ला कायदेमंत्री तर १९९९ ला शहरी विकार व रोजगार मंत्री व त्यानंतर पुन्हा कायदेमंत्री. पण त्यावेळचे सॉलिसिटर जनरल सोली सोराबजी सोबत त्याच सुत जमल नाही तेव्हा वाजपेयींनी त्यांचा राजीनामा घेतला. जेठमलानी अन वाजपेयी याचं कधीच जुळल नाही, जेठमलानी मंत्रिमंडळात असायचे ते लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे. घेतलेल्या राज्नाम्यामुळे जेठमलानी इतके नाराज होते कि 2004ची लोकसभा त्यांनी चक्क वाजपेयींच्या विरोधात लढवली.

नितीन गडकरींच्या अध्यक्षपदाच्या काळात ते पुन्हा एकदा राज्यसभेत दाखल झाले. पण जेव्हा गडकरींचा पूर्ती घोटाळा समोर आला तेव्हा जेठमलानी यांनी गडकरींवर आरोप केले तेव्हा त्यांना पार्टीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी अत्यंत योग्य असल्याचे विधान त्यांनीच सर्वात आधी 2012 ला केले होते पण त्यानंतर राजनाथ सिंहांनी त्यांना पार्टीमधून बाहेर काढले. मोदी पंतप्रधान बनतच जेठमलानींचे मोदीप्रेम आटले अन त्यांनी मोदीविरोधात अनेक विधाने केली.

प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे जेठमलानी.

महाभारतात एक योद्धा होता, बर्बरिक. हा योद्धा कदाचित महाभारताला सर्वात महान योद्धा असेल पण या योध्याचे एक विशेष होते ते म्हणजे तो नेहमी कमजोर बाजूने लढायचा. कदाचित राम जेठमलानी हे राजकारणातील बर्बरिक होते. आपल्या ७० वर्षाच्या वकीलीत त्यांनी अनेक केसेस लीलया जिंकल्या. इंदिरा गांधीच्या मारेकऱ्याची केस लढायला सुद्धा ते मागे नाही हटले. राजीव गांधीच्या मारेकऱ्याची केस सुद्धा ते लढले. डॉन हाजी मस्तान असो वा हर्षद मेहता अथवा आसाराम बापू अशा केसेस ज्यांना कुणी हातही लावला नसता त्या केसेस ते लढले.

जेठमलानी एक वकिल !!

वकीली म्हणजे जेठमलानी यांचा घरचा आखाडा, इथे त्यांना हरवणे महाकठीण. त्यांनी लढलेल्या केसेसचा आलेख द्यायचा म्हटला तर बहुदा एखादे पुस्तक लिहावे लागेल. त्यांनी हवाला केस मधून लालकृष्ण अडवाणी यांना वाचवले तर प्रसिद्ध सोहराबुद्दीन केस सुद्धा त्यांनी अमित शाह यांच्यासाठी लढली. जेसिका लाल हत्याकांड केस, २G स्कॅम असो किंवा कर्नाटकचे मुख्यमत्री येडीयुराप्पा यांच्या खनन घोटाळ्याची केस राजकारण्यांना ते पहिले आठवायचे.

अरुण जेटलींनी जेव्हा केजरीवाल यांच्यावर मानहानीची केस दाखल केली तेव्हा जेथमलानी यांनी केजरीवाल यांची केस घेतली. काही दिवसांनी त्यांनी तब्बल 9 कोटी रुपयाचे बिल केजरीवाल यांना पाठवले. अर्थात केजरीवाल ते भरू शकले नाहीत अन पुढे त्यांना या केसमध्ये अरुण जेटली यांची माफी मागावी लागली.

तुम्हाला राम जेठमलानी आवडो अथवा न आवडो, पण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते इतके मोठे झाले कि तुम्ही त्यांना ignore करूच शकत नाही. व्हायरल महाराष्ट्र कडून राम जेठमलानी यांना श्रद्धांजली.

admin

Recent Posts

नरेंद्र मोदींनी “कचरा उचलतानाचा फोटोशूट” केला का ?

१२ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी महाबलीपुरम(दुसर नाव मामल्लापुरम) येथे होते. सकाळी सकाळी नरेंद्र मोदींचा…

2 days ago

महाबलीपुरम बीचवर मोदींच्या एका हातात कचरा होता, पण दुसऱ्या हातात काय होते ?

१२ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी महाबलीपुरम(दुसर नाव मामल्लापुरम) येथे होते. सकाळी सकाळी नरेंद्र मोदींचा…

2 days ago

चक्क !! निजामाचा महाल परस्पर विकला आधुनिक नटवरलालांनी

हैदराबादचा निझाम अन त्याच्या संपत्तीचे किस्से कुणाला माहिती नाहीत. निझामाच्या संपत्तीचे अनेक किस्से लोक आजही चवीने चघळताना आढळतात. निझाम आजकाल…

1 week ago

अपक्ष उमेदवार रोहित पवारांचा अर्ज बाद

निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत अगदी अर्जही भरून झाले आहेत. अनेक उमेदवार आपल नशीब, काम, जनसंपर्क हे या निवडणुकीत आजमावत…

1 week ago

अबब !! या उमेदवाराइतकी संपत्ती इतर कुणाचीही नाही

भाजपने यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचे तिकिटे कापले, त्यापैकीच एक होते माजी मंत्री प्रकाश मेहता. माजी मंत्री प्रकाश मेहतांना डावलून त्यामानाने…

1 week ago

रितेश जेनेलिया कस भांडतात माहितीये ??

"तुझे मेरी कसम" चित्रपटातून ते एकत्र मोठ्या पडद्यावर आले अन त्यांची amazing केमिस्ट्री अवघ्या जगाने पहिले. यानंतर अनेक वर्ष डेट…

3 weeks ago