Spread the love

कठूआ, सासाराम, उना इथे घडलेल्या काही अमानुष बलात्काराच्या घटनांमुळे देशभरात अत्यंत संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बलात्कारासाठी भारतात असलेली शिक्षा ही पुरेशी आहे कि नाही ? यासंधार्भात अत्यंत मतांतरे आहेत. बहुतांश लोकांना वाटते कि बलात्कारासाठी मोठ्यात मोठी शिक्षा असावी, अन ती अत्यंत भयानक सुद्धा असावी जेणेकरून बलात्काराचा विचारसुद्धा करताना माणसाचा आत्मा कापला पाहिजे. सोशल मिडीयावर अशा शिक्षांचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत, अन हजारो लोक अशा अमानुष शिक्षेंची मागणी करत आहेत. व्हायरल महाराष्ट्रला सुद्धा असेच वाटते, कि अशा नराधमांना फाशीची शिक्षा सुद्धा पुरेशी नाही.

2012 च्या निर्भया गैंगरेप-मर्डर नंतर देशात रेप कायद्यात कडकपना आणला होता सोबतच नाबालिकान्सोबत होणाऱ्या अपराधांसाठी वेगळा POCSO कानून बनवला गेला. पॉक्सो म्हणजे, प्रॉटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऐक्ट. लहान मुलांसोबत होणाऱ्या अपराधांची तीव्रता हि इतर अपराधांपेक्षा जास्त भयानक असते. तरीही या कायद्याला अजून कडक बनवावे असे लोकांना वाटते.

ही होती भारतासंबंधीची गोष्ट आता आपण जाणून घेऊया, जगातल्या इतर देशात या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहेत. “व्हायरल महाराष्ट्र” नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी याबद्दल लेख घेऊन आले आहे.

नॉर्वे:

नॉर्वे अथवा इतर स्कंडेवियन देश हे जगण्यासाठीच्या सगळ्यात चांगल्या ठिकाणांपैकी मानले जातात, या देशाच्या कायद्यानुसार जर समोरच्याची इच्छा नाहीये(ती तुमची लग्नाची बायको/नवरा असला तरी) अन तुम्ही त्या व्यक्तीसोबत काही लैन्गिंग हरकत कराल तर या कृतीला बलात्कार मानले जायील. अन या गुन्ह्यासाठी ४ ते १५ वर्षापर्यंतची जेल होऊ शकते. नॉर्वे मध्ये असे अपराध कमीच होतात, केवळ बलात्कारच नव्हे तर इतर कोणतेही अपराध नॉर्वे मध्ये कमी होतात, अन जवळपास सगळे कारागृह रिकामेच असतात.

अमेरिका:

अमेरिकेत दोन प्रकारचे कायदे आहेत एक फेडरल तर दुसरे स्टेट. वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेग-वेगळे नियम आहेत. फ्लोरिडा मध्ये जर लहान मुलांसोबत बलात्कार झाला तर, फाशीची सजा दिली जाते.

फ्रांस:

इथे बलात्कार संबंधी कायदे सख्त आहेत अन यासाठी 15 वर्ष ते 30 वर्षाची जेल होऊ शकते. क्रूर मामल्यानुसार शिक्षा जास्तसुद्धा होते.

बेल्जियम:

इथे जर रेप करणारा आपला गुन्हा कबुल करत असेल अन विक्टिम सोबत समझौता करत असेल तर विना कोणत्याही शिक्षेचा तो मोकळा सुटेल.

बांग्लादेश:

रेप ची सजा इथे रेप च्या क्रूरता च्या हिशोबाने ठरते, खूप क्रूर- बर्बार्तेने झालेल्या बलात्काराला व लहान मुलीसोबत झालेल्या बलात्काराला इथे फाशीची शिक्षा दिली जाते. काहीवेळा जन्मठेपेची शिक्षा सुद्धा दिली जाते.

जापान:

20 वर्षे जेल अन जर क्रूर मामला असेल अथवा बालात्कारासोबत अन्य गुन्हेसुधा केले असतील तर मृत्यूची शिक्षा दिली जाते.

क्यूबा:

12 वर्षापेक्षा लहान मुलांसोबत बलात्कारास इथे मृत्यूची शिक्षा नक्की आहे, अन जर बलात्कारा दरम्यान विक्टिम गंभीरपणे जखमी झाली असेल तरीसुद्धा रेपिस्ट ला फांसी दिली जाते. जर एखादा रेपिस्टने अगोदरसुद्धा रेप केला असेल तर त्याला फाशिवरच चढवले जाते. जर यौन बीमारी असेल अन त्याने कुणाचा तरी रेप केलाय तर त्यालासुद्धा फाशी दिले जाते.

पाकिस्तान:

आपल्या इथे जशा खाप पंचायती आहेत तशाच पाकिस्तान मध्ये कबीलाई पंचायतें आहेत यांना “फिरका” म्हणतात. या पंचायतींनी दिलेले निकाल खूप भयानक असतात, उदाहणार्थ एखाद्याने रेप केलाय तर पंचायत सांगेल कि विक्टिम च्या कुटुंबातील कोणी व्यक्ती रेपिस्ट च्या परिवारातील महिलेचा बलात्कार करेल. शरिया मध्ये याला ‘लॉ ऑफ रिट्रिब्यूशन’ म्हणतात.

अफगानिस्तान:

शिक्षेच्या बाबतीत अफगाणिस्तान फार जलद आहे जर एखाद्याला रेप करताना पकडले गेले तर ४ दिवसात निकाल दिला जातो एकतर रेपीस्ट ला रस्त्यावर उभे करून डोक्यात गोळी घातली जाते किंवा फाशीवर चढवले जायील.

नीदरलैंड्स:

रेप बद्दल इथे खूप कडक कायदे आहेत एखाद्याला त्याच्या मर्जीविरुद्ध चुंबन करणे सुद्धा इथे एक गुन्हा मानले जाते. जर एखाद्याने वैश्येसोबत बलात्कार केला तर त्याला ४ वर्षाची जेल होते. यादाम्यान जर ती वेश्या मरण पावली तर १५ वर्षाची जेल होईल. क्रूर मामला असेल तर जास्त शिक्षा होईल.

मोरक्को:

इथे एक कायदा होता, कि बलात्कार करणार जर त्या मुलीसोबत लग्न करेल तर त्याला शिक्षा होणार नाही. २०१४ मध्ये हा कायदा बदलवला गेलाय.

बहरीन, इराक, जॉर्डन, कुवैत, लेबनान, फिलिस्तीन, फिलिपीन्स, ताजीकिस्तान और ट्यूनिशिया

मध्ये आजही असा कायदा अस्तित्वात आहे ज्याद्वारे जर बलात्कार करणारा मुलीसोबत लग्न करत असेल तर त्याला कोणतीही शिक्षा होणार नाही.

चीन-

चीन हा बलात्कारी व्यक्तीला सर्वात भयानक शिक्षा देणारा देश असेल, इथे बलात्कारासाठी मृत्यूदंड दिला जातो, अन जननांग कापण्याच्या शिक्षा सुद्धा होतात.

इराण-

इराण हा देश सुद्धा बलात्कारी लोकांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जातो. रेपीस्टला इथे भर चौकात मारले जाते.

सौदी-

सौदीमध्येसुद्धा रेपीस्ट चे लोकांसमोर डोके उडवले जाते, अन त्यानंतर सर अन धड यांना एकत्र शिवून अंत्यसंस्कार केले जातात. दगडाने ठेचून मारण्याचीसुद्धा हि परंपरा आहे