Spread the love

मराठीमध्ये एक नवा ट्रेंडसेट करणारी सिरीयल “रात्रीस खेळ चाले” पुन्हा एकदा नव्या कोऱ्या रुपात आपल्याला भेटायला येत आहे. पहिल्या सीजन मध्ये आपल्या रात्री भुताच्या भीतीने जागवणारी अन नाईक कुटुंबाच्या बाबतीत घडणाऱ्या थ्रिलर अन चित्तथरारक सस्पेन्स ने अवघ कोकण टीवी च्या माध्यमातून आपल्या घरात येणारी सिरीयल पुन्हा आलीये.

ratris khel chale season 2
ratris khel chale season 2 is live

मालवणच्या एक गावाभोवती फिरणाऱ्या या सिरियल्सचे प्रोमो रिलीज झालेले आहेत. १४ जानेवारीपासून ही सिरियल्स आपल्याला झी मराठी या वाहिनीवर पाहायला मिळेल. पांडू म्हणजेच प्रल्हाद कुडतरकर यांचा “ता इसारलाय” अन जबरदस्त अभिनय पाहण्यासाठी नक्की तयार रहा. बऱ्याच जणांना माहिती नसेल पण रात्रीस खेळ चाले च्या पहिल्या पर्वाच लेखन पांडूनेच केले होते अन आता दुसऱ्या पर्वाच लेखनसुद्धा प्रल्हादच करत आहे त्यांना ललिता सावंत अन राजू घाग यांनी मदत केली आहे. “जुन्या-नव्या पत्रानासोबत, भीती अन मजा ही यावेळी दुपटीने वाढणार आहे” अस ते म्हणाले.

अन सोबतच व्हायरल महाराष्ट्र च्या “गावाकडच्या भुताच्या गोष्टी” वाचायला पण विसरायचं नाही.