Breaking News
Home / Interesting / नरेंद्र मोदींनी “कचरा उचलतानाचा फोटोशूट” केला का ?

नरेंद्र मोदींनी “कचरा उचलतानाचा फोटोशूट” केला का ?

१२ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी महाबलीपुरम(दुसर नाव मामल्लापुरम) येथे होते. सकाळी सकाळी नरेंद्र मोदींचा एक विडीयो समोर आला, या विडीयोमध्ये नरेंद्र मोदी बीचवरील कचरा उचलत आहेत. प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा ट्वीट करूनसुद्धा सांगितले कि ते मामल्लापुरम वरच्या बीचवरील कचरा उचलत आहेत सोबतच त्यांचे देशभरातल्या जनतेला संदेश दिला कि त्यांनीसुद्धा ही काळजी घ्यावी कि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असावे.

जसा मोदींचा विडीयो व्हायरल होतो, तसे अजून काही फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले. या फोतोंमधून अस वाटत होत कि, मोदींनी अक्षरशः देखावा उभा केलाय.

पहिल्या फोटोमध्ये काही लोक बीचवर कचऱ्यासोबत आहेत एका फोटोमध्ये बीचवर बॉम्ब स्क़्वाड बीचची तपासणी करताना दिसत आहे, दुसऱ्या फोटोमध्ये काही कॅमेरामन शूट करताना दिसत आहेत तर तिसऱ्या फोटोमध्ये मोदी बीचवर कचरा गोळा करताना दिसत आहेत. हे फोटो पाहिल्यावर अस वाटत कि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासमोर देखावा उभा केला आहे.

व्हायरल महाराष्ट्र च्या टीमने या फोटोमागील रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे, आमच काम आवडलं असेल तर नाही Share करा.

जसा मोदींचा विडीयो व्हायरल झाला तशा सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया उठल्या, काहींना तो विडीयो खूप आवडला तर अनेकांनी मोदींना ट्रोल केल. ट्रोल करणाऱ्यामध्ये एक ट्वीटर हेन्डल होत “Rofl Republic” या हेन्डल वरून चार फोटो ट्वीट केले गेले. अन काही तासाभरात हे फोटो तुफान व्हायरल सुद्धा झाले. आता आपण जाणून घेऊ या फोटोंची सत्यता

पहिला फोटो आहे, सुरक्षारक्षक(Bomb Squad) बीचवर सुरक्षा पाहणी करत आहे. हा फोटो खरा आहे पण हा फोटो आहे ११ एप्रिल २०१९ चा, जेव्हा नरेंद्र मोदींनी कोझिकोडे, केरल येथे एक निवडणूक रेली केली होती त्यावेळचा.

दुसरा एक फोटो आहे, ज्यामध्ये दिसतंय कि काही विदेशी कॅमेरामन बीचवरती कशाचे तरी शूट करत आहेत. मजेदार म्हणजे हा फोटो भारतातला नाहीच आहे. स्कॉटलंडमध्ये st. अन्द्रेव येथे वेस्ट स्यांड बीच आहे तिथला हा फोटो आहे.  tayscreen.com या वेबसाईट वर आजही हा फोटो तुम्हाला जसाचा तसा पाहायला मिळू शकतो.

तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, पण अफवा पसरवणे हे काही बरोबर नाही. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर हा लेख सर्वांपर्यंत नक्की पोहचवा

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Covid Corpna Birth

रायपुर मध्ये जन्मली ‘कोविड’,’कोरोना’ नावाची जुळी मुले

तुम्ही म्हणाल ही काय बाष्कळ बडबड चालू आहे. कोरोना अन कोविड यांच्या मुळे कुणालातरी आनंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × two =