Spread the love

पोलीस अटक करायला आले तर… माहिती असावेत असे तुमचे ६ अधिकार …! “शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये” अस सर्वसामान्य माणसे नेहमीच म्हणतात, अन हि पायरी चढायला लावणाऱ्या कायद्याच्या राक्षकांबाबत समाजामध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बहुतांश लोक पोलिसांना घाबरून असतात. पोलिसांची गाडी दारात आलेली दिसताच अनेकांची घाबरगुंडी उडते, अर्थात त्यांनी चूक केलेली असो वा नसो.

पण कायद्याने ज्याप्रकारे पोलिसांना काही अधिकार दिलेले आहेत, त्याचप्रमाणे नागरिकांनासुद्धा बरेच अधिकार दिलेले आहेत, चला आज व्हायरल महाराष्ट्र च्या लेखामध्ये जाणून घेऊया, नागरिकांच्या काही अधिकारांच्याबद्दल जे आपण पोलीस कारवाईच्या वेळी वापरू शकतो.

१. अटक करणाऱ्या पोलिसाच्या वर्दीवर नावाची प्लेट आवश्यक

जर एखादा पोलीस जर तुम्हाला अटक करायला आला, अन त्याच्या वर्दीवर नावाची प्लेट नसेल तर तुम्ही त्याला सरळसरळ नकार देऊ शकता. अन अशा पोलीसाविषयी तक्रारसुद्धा नोंदवता येते.

२. अटकेचे कारण सांगणे आवश्यक

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मुलभूत अधिकार दिले आहेत, त्यामुळे आपणाला कोणत्या कारणासाठी अटक होते हे जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकार दिलेला आहे. अर्थात याला अपवादसुद्धा आहेत पण ९९% गुन्ह्यांच्या अत्केमध्ये अटकेचे कारण सांगणे बंधनकारक आहे.

३. जामीनपात्र गुन्ह्यात अटक झाली असेल तर जामिनावर सोडण्याबाबत सूचित करणे.

जामीनपात्र गुन्ह्यात जर अटक झाली असेल तर आरोपीला तुम्हाला जामीन घेता येतो हे सूचित करणे आवश्यक आहे.

४ अटकेच्या वेळी पोलीस मेमोरेंडम तयार करतात त्यात अटक होणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी आवश्यक असते

५.अटक होणार्या व्यक्तीला आपल्या पसंतीचा वकील निवडण्याची परवानगी असते.

६. महिला आरोपीला फक्त महिला पोलिसाच अटक करू शकतात. पुरुष पोलिसांनी महिलेला अटक करणे हे चुकीचे समजले जाते.