Breaking News
Home / मनोरंजन / Sacred Games पहिल्या भागांची नावे अन पौराणिक संबंध

Sacred Games पहिल्या भागांची नावे अन पौराणिक संबंध

6 जुलाई ला नेटफ्लिक्स ने भारतामध्ये आपले पाय पसरवणे सुरु केले. विक्रम चंद्रा नावाच्या एका लेखकाची हजार पानांच्या नॉवेल ‘सेक्रेड गेम्स’ वर आधारलेली त्यांनी एक नवीन सीरीज सुरु केली आहे. या सिरीजच्या पहिल्या पर्वाचे आठ भाग प्रदर्शित झाले आहेत, अन या पर्वाने अभूतपूर्व अस यशसुद्धा मिळवले आहे. गोष्टीमध्ये सरताज सिंह (सैफ अली ख़ान) नावाचा एक मुंबई पुलिसातला ईमानदार इंस्पेक्टर दाखवलाय सुरवातीलाच त्याला एक निनावी फोन येतो अन समोरचा म्हणतो “25 दिन में मुंबई खत्म हो जाएगी, बचा सकते हो तो बचा लो”. फोन करणारा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून एक मोठा गैंगस्टर गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) असतो. पुढची गोष्ट तुम्ही स्वतः पहिली तर जास्त मजा येयील.
तर या वेब-सिरीज मध्ये जे आठ भाग दाखवले आहेत, त्यांची नावे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अन प्रत्येक नावामागे एक पौराणिक कथा आहे. तर व्हायरल महाराष्ट्र तुमच्यासाठी या ८ गोष्टी घेऊन आले आहे.

  1. अश्वथामा

अश्वथामा, ज्याला महादेवाचा अवतार सुद्धा म्हटले जाते. द्रोणाचार्य अन कृपी यांचा पुत्र जेव्हा जन्माला आला तेव्हा गळ्यातून घोड्याच्या खिंकाळन्यासारखा आवाज आला म्हणून हा “अश्वथामा”. जन्मापासुंनाच याच्या डोक्यावर एक मनी होता. महाभारता मध्ये सर्वोत्कृष्ट योद्ध म्हणून अर्जुन कर्ण यांची चर्चा होते पण अश्वथामा अर्जुन अन कर्ण यांच्यापेक्षा कमी नवता. अर्जुनपत्नी उत्तरेच्या गर्भावर ब्रम्हशीर अस्त्र चालवण्यामुळे अश्वथामा शापित आहे. अन सहा चिरंजीवी लोकांमध्ये सामील आहे.

  • हलाहल

समुद्र मंथनमध्ये चौदह मूल्यवान वस्तु निघाल्या होत्या. कामधेनु गाय, उच्चैःश्रवा घोड़ा, ऐरावत हत्ती, कौस्तुभमणि नावाचा का हीरा, कल्पवृक्ष, रंभा अप्सरा, देवी लक्ष्मी, वारुणी नावाची मदिरा, चंद्रमा, परिजात वृक्ष, शंख, देववैद्य धनवंतरि अन अमृत का घट. पण या सर्वांच्या आधी निघाले होते ते हलाहल नावाचे विष. या विषाच्या तेजाने देव अन दानवांचे अंग जळायला लागले तेव्हा देवाधी देव महादेवाला बोलावले गेले. अन महादेवाने विष पिऊन सर्वांचा जीव वाचवला

  • अतापी वातापी

प्राचीन काळी मानिमती नगरीमध्ये एक प्रबळ असुर राज्य करत होता. या राक्षसाचे नाव अतापी होते, वतापी हा त्याचा छोटा भाऊ. एकदा अतापी ने एक ब्राम्हणाला प्रार्थना केली कि इंद्रासारखा प्रतापी पुत्र त्याला होऊ दे, पण ब्राह्मणाने त्याला नकार दिला. तेव्हा अतापीने ब्राह्मणांना मारायचा प्रण केला. अतापीला संजीवनी विद्या येत होती, तर वतापी रूप बदलण्यात पारखी. तो काय करायचा ब्राह्मणाला जेवायला बोलवायचा अन त्यांना बकरा बनलेल्या आपल्या भावाच मांस खाऊ घालायचा. जेवण संपल्यानंतर अतापी आपल्या भावाला जिवंत करायचा परिणामी ब्राह्मणाच पोट फाटायचं. एकदा अगस्त्य ऋषी अतापीकडे जेवायला आले. नेहमीप्रमाणे अतापीने त्यांना वतापीच मांस खाऊ घातले. पण अतापीने संजीवनी मंत्र म्हटला तेव्हा वतापी जिवंतच झाला नाही. अगस्त्य मुनींनी अल्पशा काळात ते मांस पचवले होते. नंतर अतापी मुनींना शरण गेला.

  • ब्रह्महत्या

विश्वरूप नावाचे एक साधू होते, ज्यांना तीन डोके होते. एकदा इंद्राला कळले कि हे विश्वरूप फक्त देवांना अर्ध्य देत नाहीत तर असुरांना पण देतात. क्रोधीत होऊन इंद्राने त्यांची हत्या केली. अस केल्याने इंद्राला ब्रह्महत्येचे पाप लागले, अन तिथे ब्रह्महत्या प्रगत झाली. या ब्रह्महत्येपासून वाचण्यासाठी इंद्र ३०० वर्ष पाण्याखाली लपून राहिला तर लाखो वर्ष एक फुलामध्ये लपून राहिला. इंद्राला पापमुक्त करण्यासाठी ब्रह्महत्याच दोष ४ ठिकाणी वाटण्यात आला, पृथ्वी, जल, स्त्री अन झाडांना एक-एक हिस्सा देण्यात आला.

  • सरमा – सरमा देवलोकीची एक कुत्री होती
  • प्रेतकल्प

हिंदू धर्मात १८ पुराने आहेत, अन गरुडपुराण त्यापैकीच एक. गरुडपुराणाचा दुसरा हिस्सा मृत्युनंतर काय होते यावर आधारित आहे. आपल्या कर्मानुसार काय शिक्षा मिळतात हे त्यात सांगितले आहे. प्रेतकल्प मध्ये सांगितले आहे कि मेल्यानंतर नरकात गेल्यानंतरही जीव आपल्या संबंधितांना प्रेत बनून कशाप्रकारे कष्ट देतो.

  • रुद्र

रुद्र हे भगवान भयंकर रागीट, विनाश करणारा महादेवाचा अंश. ऋग्वेदमध्ये त्याला बलवानातला बलवान म्हटले आहे. शिवपुराण मध्ये लिहलेले आहे कि कश्यप ऋषिच्या तपस्याने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांची पत्नी सुरभिच्या गर्भामधून 11 रुद्रों च्या रुपात जन्म घेतला होता.

  • ययाती

ययाती असा राजा होता ज्याने म्हातारपणी संसारातील सुखे भोगण्यासाठी आपल्या मुलाचे तारुण्य मागून घेतले होते. हजारो साल जगल्यानंतरही त्याला समाधान मिळाले नाही.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

आयुषमानच्या चष्म्यात दिसली Article 15 Movie ची स्टोरी !!

 आज आयुषमान खुराना यांच्या article १५ या चित्रपटाचा टीजर आला. भारताच्या संविधानात १५ नंबरला एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 1 =