Spread the love

भारतामध्ये भव्य अन सुंदर मंदिरांची काही कमतरता नाहीये. जगातून लाखो पर्यटक दरवर्षी आपली मंदिरे पाहण्यासाठी भारतात येतात. पण तुम्हाला माहितीये का ज्या भूमीवर सिंधू संस्कृतीची सुरवात झाली..(हडप्पा, मोहेंजोदारो) सप्तसिंधुंचा प्रवेश बहुदा ज्या भूमीवर हिंदू संस्कृतीतल्या पवित्र ग्रंथांची रचना झाली..जिथे भारतीय सभ्यता शिकण्यासाठी हजारो लोक जगभरातून येत अशा तक्षशिलेच्या भूमीवर जिथे बौद्ध धर्म सुद्धा फुलला त्या अखंड भारताच्या तुटलेल्या भूमिवर हिंदू मंदिरे आहेत..!! हो पाकिस्तानमध्ये आजही अत्यंत प्राचीन अशी मंदिरे आहेत, जिथे हर हर महादेव, जय श्रीराम असा जयघोष चालतो.

१. हिंगलाज मंदिर, बलुचिस्तान

जेव्हा देवी सतीने अग्निकुंडात उडी मांरून आपले प्राण दिले, तेव्हा माता सतीचे डोके बलुचिस्तानात पडले, हीच ती जागा..!! बलुचिस्तानामध्ये हिंगाल नदीच्या काठावर स्थित असलेले हिंगलाज मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. आजही या मंदिरात स्थानिक लोकांची श्रद्धा आहे.

२. पंचमुखी हनुमान मंदिर, कराची

हे मंदिर तब्बल १५०० वर्ष प्राचीन अस मंदिर आहे, स्थानिक मान्यता सांगते कि १७ लाख वर्षापासून या ठिकाणी पंचमुखी हनुमानजीची मूर्ती याठिकाणी आहे. या मंदिराचा जीर्नोधार १८८२ मध्ये केला गेला होता. आजही या मंदिरामध्ये गर्दी असते.

३. कटसराज मंदिर, चकवाल

माता सतीच्या वियोगाच्या दुखा:त भगवान महादेवाच्या डोळ्यातून दोन अश्रू पडले होते. त्यावेळी कदाचित त्या अश्रूंच्या थेंबांना माहिती नसेल कि त्यांचीसुद्धा फाळणी होईल. या दोन अश्रूपैकी एक थेंब पडला तो पुष्कर,राजस्थान मध्ये तर दुसरा पडला पाकिस्तानच्या चकवाल जिल्यात. सांगितले जाते कि जवळपास 900 वर्षापूर्वी इथे मंदिर बांधले गेले आहे.

४. स्वामीनारायण मंदिर, कराची

कराचीमध्ये एक बंदर रोड आहे, या रोडवर 32,306 स्क्वायरयार्ड इतक्या जागेत एक हिंदू मंदिर स्थित आहे… स्वामीनारायण मंदिर ! १६० वर्षापूर्वी बनलेल्या या मंदिरात फक्त हिंदूच जात नाहीत तर हिंदूइतक्याच श्रद्धेने मुस्लीम सुद्धा जातात. या परिसरात एक गुरुद्वारा पण आहे, हा परिसर म्हणजे कात्तार्वादी देशातला हिंदू, मुस्लीम अन सिख या तीनही धर्मांचा धर्मनिरपेक्ष प्रदेशच जणू..!! हिंगलाज मंदिराला जाणारी यात्रा इथूनच सुरु होते.

५. सूर्य मंदिर, मुलतान

रामायण अन महाभारत या दोन्ही ठिकाणी आढळून येणारे जांबवंत, या जाम्बवंताच्या मुलीचे लग्न भगवान श्रीकृष्णाशी लावले होते. श्रीकृष्ण अन जांबवंती यांचा मुलगा सांब, यानेच हे मंदिर बांधले होते. जवळपास १५०० वर्षापूर्वी आलेला चीनी बौद्ध भिक्षु शुयांग यानेसुद्धा यामंदिराबद्दल लिहलेल आहे. अत्यंत वैभवशाली असलेल या मंदिराला मुहम्मद बिन कासीम, गाजनीचा मुहम्मद अशा अनेक क्रूर शासकांनी लुटले. पाकिस्तान सरकारने सुद्धा या मंदिराकडे दुर्लक्षच केलेलं आहे.

६. श्रीवरुणदेव मंदिर, कराची

पाकिस्तानचे सर्वात मोठे शहर कराचीमध्ये, मनोरा आयलंडमध्ये असलेल हे मंदिर १०० पेक्षा जास्त वर्ष जुने आहे. या मंदिराचा उपयोग आजकाल हिंदू काउंसिल ऑफ पाकिस्तानच्या कामासाठी केला जातो. १६व्या शतकात हे मंदिर बांधले गेलेले आहे, अन याचा १९१७-१८ ला जीर्णोद्धार केला.

७. राममंदिर, इस्लामकोट

इस्लामकोट पाकिस्तानची अशी जागा आहे, जिथे हिंदू जनसंख्या जवळपास मुस्लीम जनसंख्येइतकीच आहे. पाकिस्तानात खूप कमी राममंदिरे आहेत अन इस्लामकोटचे राममंदिर हे बहुदा सर्वात मोठे.

व्हायरल महाराष्ट्र चा आजचा लेख कसा वाटला अन आणखी असे लेख हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा,