Interesting

या फोटोत गाडी चालवणारा मन्या सुर्वे नाहीच …!! जाणून घ्या या व्हायरल फोटोचे रहस्य

Written by admin

या फोटोत गाडी चालवणारा मन्या सुर्वे नाहीच …!! जाणून घ्या या व्हायरल फोटोचे रहस्य. काही दिवसांपासून फेसबुकवर हा फोटो शेयर होतोय या फोटोमध्ये एका जीप वर छगन भुजबळ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अन काही तितक्याश्या प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या व्यक्ती आहेत. कुठल्यातरी रोडशो अथवा रॅली दरम्यान हा फोटो काढला गेला असावा. तर या फोटोमध्ये दिसणारा अन गाडी चालवणारा ड्रायव्हर कोण ?? हा प्रश्न सध्या फेसबुकवर धुमाकूळ घालतोय. या फोटोखाली अक्षरशः हजारो कमेंट्स पडल्यात अन जो तो हा ड्रायव्हर मन्या सुर्वे असल्याचा दावा करतोय..

पण ह्या फोटोचे रहस्य वेगळेच आहे, व्हायरल महाराष्ट्रने या फोटोची शहानिशा केली अन जे सापडले ते नक्कीच मजेदार आन वेगळे आहे.

१९८५ साली छगन भुजबळ महापौर झाले अन त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. विजयाच्या आनंदाप्रत्यार्थ निघालेला हा रोडशो होता. अन त्यावेळचे शिवसेनेचे शाखाप्रमुख हि जीप चालवत होते अस सूत्रांकडून कललेल आहे. अर्थात त्या व्यक्तींचे नाव अजून काही कळले नाही हे विशेष.

मन्या चा encounter १९८२ मध्ये झाला तर भुजबळ १९८५ मध्ये महापौर झाले.

१९८२ ला मृत्यू झाला असल्यामुळे १९८५ च्या रोडशो मध्ये मन्याने गाडी चालवणे केवळ अशक्य आहे. तरीही संबंधित व्यक्ती व मन्या सुर्वे ह्यांच्या बऱ्यापैकी साम्य आहे, अन म्हणूनच हजारो लोक या फोटोच्या बाबतीत चुकले.

कोण होता मन्या सुर्वे ?

तुम्ही शूटआउट एट वडाळा पहिला का?? त्या चित्रपटात जोन अब्राहम ने साकारलाय तो मन्या सुर्वे. त्याला मन्या भाई असेही म्हटले जायचे. खूप लोकांचे मत आहे कि जर मन्या काही दिवस अजून जगाला असता तर… पुढची १० वर्षे मुंबईची परिस्थीती वेगळी असती. कारण १९८२ लाच त्याने दाउदच्या भावाला भर रस्त्यावर ठोकले होते, अन दाउद च्या मोहल्ल्यात जाऊन गोळीबारसुद्धा करून आला होता.

About the author

admin

Leave a Comment

13 − ten =