Spread the love

या दुनियेत लाखो असे स्थळे आहेत ज्यांच्यामागे एक गहरे रहस्य लपलेले आहे. हजारो वर्षांपासून लोक या ठीकांनांना भूतीया स्थळे मानत आहेत, अन अशा ठिकाणी लोक जाण्यासाठी लवकर तयारसुद्धा होत नाहीत याच्यापाठीमागे एकप्रकारची भीती असते. रहस्यमय किल्ल्यांच्याबद्दल तर तुम्ही ऐकलेच असेल, पण कधी तुम्ही विचार केलाय का कि एखादे मंदिर हे रहस्यमयी असू शकेल..?? तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्यमयी मंदिराबद्दल सांगणार आहोत, जे स्वतामध्ये एक खूप रहस्यमयी अन मायावी मंदिर आहे.

या मंदिराला लोक “कामाख्या मंदिराच्या” नावाने ओळखतात, अन हे गुवाहाटीपासून जवळपास १५-२० किमी दूर नीलाचल नावाच्या डोंगरावर आहे. स्थानिक लोक सांगतात कि या मंदिरामध्ये अनेक अलौकिक शक्ती आणि रहस्य आहेत.

मंदिरतला अम्बुबासी मेला

कामाख्या मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. अस सांगण्यात येते कि इथे देवी सतीच्या योनीचा भाग पडला होता अन याचमुळे हे मंदिर सतीच्या योनीचे प्रतिनिधित्व करते. माता सतीच्या बाबतीत तुम्हाला माहितीच असेल, एका कथेनुसार माता सतीच्या मृत्युनंतर भगवान महादेव सतीच्या शरीराला घेऊन सैरभर फिरत होते … आक्रोश करत होते, यामुळे सृष्टीचा समतोल धासळायला लागला होता तेव्हा भगवान विष्णू ने सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले, त्यापैकी योनीचा भाग हा.. सामग्री नावाच्या ठिकाणी पडला. हि तीच जागा आहे जिथे माता सती अन भगवान शिवासोबत नेहमी येते.

कामाख्या माता

हिंदू धर्मानुसार, कामाख्या देवीची पूजा एका नववधूच्या रुपात केली जाते. अस मानण्यात येते kee कामाख्या देवीच्या पूजेने मनुष्याला मोक्षप्राप्ती होते. त्याच्या सगळय इच्छा पूर्ण होतात. तांत्रीकांसाठी कामाख्या देवी ही काली अन त्रिपुरासुंदरी देवी नंतर सगळ्यात महत्वाची देवता आहे.

कामाख्या पूजा चा उद्देश्य

या मंदिराच्या गर्भगृहमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिमा स्थापित केलेले नाहीये. हे मंदिर समतल खडकावर मधोमध बनलेली विभाजन देवी च्या योनि ला दर्शावते. जवळच एक झरा असल्याने हा खडक नेहमी ओळ असतो अन त्यामुळेच या मंदिराला जागृत अन खूप प्रभावकारी शक्तिशाली मानले जाते. काही लोकांच्या अनुसार ह्या पाण्याला पिल्यास हरेक प्रकारचा रोग नीट होतो.

रजस्वला देवी कामाख्या

आपल्या देशात स्रियांचा मासिक धर्मला अशुद्ध मानले जाते पन कामाख्या मंदिराच्या बाबतीत अस नाहीये दरवर्षी कामाख्या में अम्बुबाची ची जत्र भरते अन यावेळी इथले पाणी 3 दिवसासाठी लाल पड़ते. लोकांच्या अनुसार हे कामाख्या देवीच्या मासिक धर्मा मुळे इथले पाणी लाल पडते. या 3 दिवसानंतर इथे लाखो भक्त पोचतात अन मासिक धर्मामुळे ओल्या झालेल्या कपड्यांना प्रसाद समजून घेतात.

जनन क्षमता चे पर्व

अम्बुबासी जत्रेला अम्बुबाची नावाने ओळखले जाते. अन याला अमेठी व तांत्रिक जन्मक्षमतेचे पर्व म्हणून साजरा केले जाते. अम्बुबासी शब्द अंबु अन बाती या दोन शब्दांच्या संयोगातून बनला आहे ज्यात में अंबु चा अर्थ आहे पानी तर बाची चा अर्थ है उतफूलन. अन म्हणूनच हा स्रीशक्ती अन त्यांच्या जन्मक्षमतेला दर्शवते. हि जत्रा इथे दरवर्षी साजरी केली जाते ज्याला महाकुंभ सुद्धा म्हटले जाते.

तांत्रिक शक्तींचे केले जाते प्रदर्शन

कामाख्या मंदिराच्या अम्बुबासी मेले च्यावेळी तांत्रिक शक्तिना खूप महत्व दिले जाते. इथे सैकड़ों तांत्रिक एकांतवासामधून बाहर येऊन आपल्या शक्तींचे प्रदर्शन करतात. हे तांत्रिक जत्रेमध्ये लोकांना वरदान देतात, त्यांची मदत करतात. अस सांगितले जाते कि कामाख्या देवीसमोर डोक तेकाल्याशिवाय  कोणी पूर्ण तांत्रिक होऊ शकत नाही.

प्राण्यांची बळी दिली जाते-

पशुचा बळी देणे आपल्या देशात वर्जित आहे पण इथे बोकड अन म्हशीची बळी देणे हि एक सर्वसाधारण गोष्ट आहे. प्राण्यांची बळी देऊन अन भंडारा प्राप्त केल्यानंतरच कामाख्या देवी प्रसन्न होते अन इथे जाणाऱ्या कुणावरही काळा जादू काम करत नाही.

व्हायरल महाराष्ट्र चा हा लेख आवडला असेल, तर कमेंटमध्ये सांगा… आपण या लेखाच्या लेखकाकडून अशा प्रकारचे लेख तुमच्यासाठी लिहून घेऊ.