Categories: Interesting

अंतरीक्ष कचरा अन पृथ्वी !!

माणसाच्या इतिहासात ४ ऑक्टोबर १९५७ या दिवसाच खास अस महत्व आहे, या दिवसाने माणसाला एक वेगळी दिशा दिली, एक नव दार उघडून दिले …. अवकाशाच दार. ४ ऑक्टोबर १९५७ ला रशियाने पृथ्वीचा पहिला उपग्रह स्फुटनिक १ ला पृथ्वीच्या कक्षेत सोडलं होत. एक तो दिवस होता अन एक आजचा दिवस आहे… आज २००० पेक्षा जास्त उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पृथ्वीची प्रदक्षिणा करतायेत. या उपग्रहांनी आपल जीवन खूप सुसह्य केलाय … हाय speed नेट असो वा mobile फोन अथवा GPS या सुविधा ह्या satelites चीच देन आहेत.

प्रत्येक दोन-तीन महिन्यात कोणता न कोणता देश आपला एखादा उपग्रह सोडतोच. पण जस प्रत्येक गोष्टीचे काही चांगले फायदे असतात तसेच काही धोकेसुद्धा असतात. अर्थात या धोक्यांकडे जग काळजीने पाहतंय पण कुणी काही खास करत नाहीये

आजच्या एपिसोड मध्ये आपण याच SPACE DEBRIS अथवा SPACE JUNK बाबत बोलणार आहोत. ज्या प्रमाणात हा कचरा वाढतोय जर वेळीच याच्यावर लक्ष नाही दिले गेले तर भविष्यात कोणताही satelite वाचणार नाही अन आपल्याला प्रगत म्हणवणारा माणूस पुन्हा मध्ययुगात फेकला जायील.

अंतराळातून काढलेला पृथ्वीचा एखादा तरी विडीयो तुम्ही नक्कीच पहिला असेल … किती शांत,सुंदर अन स्वच्छ अस ते दृश्य मनाला एकप्रकारचे समाधान देते. पण असे विडीयो हे सत्याशी फारकत घेऊन बनवलेले आहेत. आकाशात पृथ्वी कशी दिसते…??? पाहायचय तर हे दृश्य पहा …!!! थोडासा धक्का बसला असेल ना ?? आता तुम्हाला हा जो कचरा दिसतोय ना … हा काही अंतरिक्षात पहिल्यापासून होता अशी गोष्ट नाहीये… हि आपली माणसाचीच देन आहे अन यालाच आपण space debris/space junk अथवा मराठीत बोलायचं झाल्यास अंतरीक्ष कचरा म्हणतो.

इतका कचरा इथे आला कसा?

जेव्हा आपण कोणताही उपग्रह अथवा यान आपण अवकाशात सोडतो तेव्हा लौंच vehicle चा वापर करतो, साधारणपणे ही रोकेट असतात अन यांच काम असत ते उपग्रह अथवा यानाला गती देणे अन पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर काढणे. जस यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडते हे लौंच vehicle यानापासून वेगळी होतात अन त्यातली उर्जा संपलेली असल्याने तिथेच राहतात.

याचप्रमाणे उपग्रहांचे सुद्धा एक वय असते, अन या वयानंतर ते काम करण्याच थांबवतात. जेव्हा त्यांचे मशीन्स काम करणे सोडून देतात तेव्हा हे शास्राज्ञांच्या नियंत्रणातून मोकळे होतात अन अंतराळात सैरभैर फिरयला लागतात.

याचप्रमाणे cube satelite नावाचे छोटे satelite असतात जे तुलनेने कमी खर्चिक असतात अन space station मध्ये समान पोचवण्याच काम करत असतात. जेव्हा ते समान पोचवतात त्यानंतर ते सुद्धा या space junk चा एक भाग बनून राहतात. दिशाहीन फिरणाऱ्या या कचर्यामध्ये अनेकदा धडक होते, अन त्यामुळे हा कचरा छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजित होऊन अधिक मोठ्या प्रमाणात परसतो.

आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल कि Space Debris हा प्रकार काय आहे? अन हा कसा तयार होतो?

काय धोके आहेत या अंतरीक्ष कचऱ्याचे?

हवामानविषयक उपग्रह व संदेशवहन उपग्रह Geo-Synchronous म्हणजेच भूस्थिर कक्षेच पृथ्वीची प्रदक्षिणा करतात. एक रिपोर्ट नुसार lower earth orbit मध्ये 600 active satelite आहेत जे १५०० पेक्षा जास्त satelite space debris मध्ये वेढले गेलेले आहेत. जस तुम्हाला माहिती कि या कचऱ्यावर मानसाच काहीही नियंत्रण नाहीये अन म्हणूनच हा कचरा कधीही एखाद्या active satelite शी धडकून त्याला निकामी करू शकतो. याच रिपोर्टनुसार दरवर्षी १ active satelite या debris ला धडकून निकामी होतो.

पूर्ण orbit ची गोष्ट करायची झाल्यास इथे २००० पेक्षा जास्त active satelites आहेत जे ५ लाख पेक्षा जास्त निकामी झालेल्या satelites च्या कचऱ्याने घेरलेले आहेत. २०१४ मध्ये international Space Station ला या debris च्या भीतीमुळे आपल स्थान ३ वेळा बदलावे लागले होते.

मोठमोठ्या संस्था अन सगळेच देश यावर गांभीर्याने चर्चा करत आहेत, या कचऱ्याला पृथ्वीच्या वातावरणात आणून नष्ट करण्यावरही विचार चालू आहे. अमेरिकाही space Fence नावाचा एक कार्यक्रम सुरु करणार आहे ज्याद्वारे ते १०cm इतक्या लहान junk ला सुद्धा trace करू शकतील.

आपण इतक्या भयानक पद्धतीने अवकाशात कचरा करत आहोत कि जर आज space debrice वर कंट्रोल करण्यात नाही आले तर येत्या १०० वर्षात संपूर्ण पुथ्वी या debris ने झाकली जायील अन एकही satelite आपण सोडू शकणार नाहीत अन सोडलेला एकही satelite जिवंत राहणार नाही. अन मानून १००० वर्ष मागे जायील …

admin

Leave a Comment

Recent Posts

सैफ आणि अमृताच्या लग्नात दहा वर्षाची करिना बोलली होती असे काही… ऐकूण चकित व्हाल…!

सैफ अली खान कुणाला नाही माहित बॉलीवूडमधील नवाब आणि तैमुर चा बाप, सर्वांनाच माहिती आहे.…

4 days ago

अयोध्येच्या राममंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात;संभाजी भिडे यांची मागणी

सांगली- अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन ५ ऑगस्ट ला होणार आहे अन अयोध्येतल्या या ऐतिहासिक प्रसंगासाठी…

5 days ago

अनोखी ओवाळणी, दादा परत ये भावनेला साद घालत नक्षली भावाने केले आत्मसमर्पण

नवी दिल्ली – एका बहिणीसाठी तिचा भाऊ वाईट मार्गावरुन चांगल्या वाटेवर येत असेल अन एका…

5 days ago

किस्से मैत्रीचे – लग्नात भेटले, मैत्री झाली नी बलाढ्य फायनान्स कंपनीची स्थापना

महिंद्रा ग्रुप कुणाला माहिती नाही ? अन आनंद महिंद्रा हे नावही गावागावात पोचलेले आहे. त्याप्रमाणे…

6 days ago

किस्से मैत्रीचे – शतकांची नी वडापावाची भूक

आज मित्रता दिवस, तुमच्या आमच्या भाषेत म्हणायचं झालं तर फ्रेंडशिप डे... या पार्श्वभूमीवर व्हायरल महाराष्ट्र…

6 days ago

मोठी बातमी : विराट कोहलीला अटक करा, मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल

हैद्राबाद : ‘ऑनलाइन जुगारा’ला प्रोत्साहन दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीविरोधात मद्रास उच्च न्यायालयात…

7 days ago