Spread the love

पाकिस्तानी “जनरल”च्या घरात घुसून माहिती काढणारी भारतीय महिला जेम्स बॉंड …!! वाचा ‘राझी’ ची गोष्ट…!! आलीया भटच्या येणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय, या सिनेमाच्या रूपाने एक दर्जेदार चित्रपट मिळण्याची अपेक्षा या ट्रेलरने नक्कीच निर्माण केलीय. “राझी” या सिनेमाची गोष्ट हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक एका काश्मिरी मुलीच्या ‘सत्यकथे’वर लिहले गेलेले आहे जिच नाव सहमत खान होत.

“जी बाई, जनरल याह्या खानच्या नातवंडांना शिकवते… जी बाई, एका आर्मी ऑफिसरची बायको आहे… ती एक भारतीय गुप्तचर असेल असा संशयसुद्धा पाकिस्तानींना आला नाही. काश्मीरचे लोक सुद्धा भारतावर तितकेच प्रेम करतात जितके आपण मराठी. अन जितका कर्मठ हिंदू देशासाठी मारायला तयार असतो तितकाच एक मुस्लीम… हे पुस्तक लिहायला सिक्का यांना तब्बल ८ वर्ष लागले”

आता तुम्ही विचारात पडला असाल कि हि सहमत खान कोण ?? अन इचे नाव कधीच आपण का नाही ऐकले? यासारखे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील, अन या सगळ्यांची उत्तरे तुम्हाला mainstream मिडिया तरी नक्कीच देणार नाही(कारण ते जाती, धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करायला गुंतले आहेत). तर तुमचा आवडत मराठी पेज “द व्हायरल महाराष्ट्र” तुमच्यासाठी घेऊन आलय एका देशभक्त मुलीची कहाणी.

दुनिया हि गुप्तहेरांनी भरलेली आहे, प्रत्येक देश आपल्या विरोधी देशाची महत्वपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो अन याला भारत अन पाकिस्तान दोघेही अपवाद नाहीयेत. सहमत खान हि अशीच एक गुप्तचर…! अर्थातच सहमत हे तिचे बदललेलं नाव कारण सहमत हि काही मोजक्या गुप्तचरांपैकी एक होती जी स्वतःचे काम संपल्यावर भारतात परत आली होती, अन सुरक्षेच्या कारनामुळे तिची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. या महिलेने पाकिस्तानमध्ये राहून भारताला अत्यंत महत्वपूर्ण अशा बातम्या अन माहिती दिली. सिक्का यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते कि “ती, भारताच्या काही मोजक्या गुप्तचरापैकी एक आहे जी आपले काम पूर्ण करून सहीसलामत परत आली होती”

१९७१ च्या युद्धाअधी भारताला काही अशा गुप्तचरांची गरज होती, जे पाकिस्तानमध्ये राहून भारताला त्यांची इत्यंभूत माहिती देतील. अन अशातच एक काश्मिरी कारोबारी आपल्या मुलीला याविषयी पटवून द्यायला तयार झाला. सहमत खानचा अन गुप्तचरीचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नवता, ती तर एका सामान्य कुटुंबातली सामान्य मुलगी होती. यानंतर तिचे लग्न एका पाकिस्तानी आर्मी ऑफ़िसरसोबत लावण्यात आले. अन याच आर्मी ऑफ़िसरच्या घरी राहून ती पाकिस्तानी सेनेची अत्यंत गोपनीय माहिती भारताला पुरवते.

याच गुप्तहरीच्या जोरावर खूप जीवांना जीवदान मिळाले. सहमत ने एका मुलीचे… बायकोचे अन या सगळ्याच्या वर एका देशभक्त गुप्तहेराचे काम तंतोतंत बजावले. जेव्हा ती पाकिस्तानमधून परत आली तेव्हा ती गर्भवती होती अन तिने नंतर एक मुलाला जन्म दिला.. हा मुलगा पुढे जाऊन आपल्या आईसारखाच देशभक्त बनला अन आर्मी मध्ये अधिकारी बनून देशाची सेवा करतोय.

या कथेचे लेखक हरिंदर सिक्का कारगिल युद्धाच्या वेळी कारगिल मध्ये होते तेव्हा त्यांची भेट सहमतच्या मुलाशी झाली जो कि कारगिलमध्ये जीवाची बाजी लावून लढत होता. पण हळूहळू त्यांना कळले “मुलाला लाजवेल असा पराक्रम त्याच्या आईने केला आहे” त्यानंतर ते सहमतला सुद्धा भेटले. अन कारगिल युद्धावर पुस्तक लिहायला निघालेले अन स्वतः नेवी ऑफिसर असलेले सिक्का सहमत खानवर पुस्तक लिहून बसले. खाली ट्रेलर पहा…!!