Spread the love

तुम्हाला राधिका माहितीये ?? गुरुनाथ अन शन्या ?? महाराष्ट्रात अन महिलामंडळाला असा प्रश्न विचारला तर तुम्हाला अक्षरशः वेड्यात काढण्यात येयील कारण “माझ्या नवऱ्याची बायको” हि मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोचलीय अन सोबतच… राधिका, रेवती, जेनी-आनंद, गुरुनाथ, शनाया हेसुद्धा…!!

मराठीतील सर्वात चर्चित मालिका असणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ने पुन्हा एकदा टीआरपीचा उच्चांक मोडला आहे अन तब्बल 8.7 टीआरपी मिळवत हि मालिका सध्या टॉपलिस्टवर आहे. या रेकोर्डनिम्मित्त टीमच्या सर्व कलाकारांनी सेलिब्रेशन केले. व्हायरल महाराष्ट्र तुमच्यासाठी त्यांचे फोटो घेऊन आले आहे.

अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याने लिहीले की, Thank you for your Love. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे अविश्वसनीय असा हा आकडा गाठु शकलो. आकडे बदलत रहातील पण हे प्रेम असच असु द्या.