Spread the love

भारतीय बँकांना 9 हजार कोटींचा गंडा घालून इंग्लंडमध्ये पळून गेलेला 62 वर्षाचा विजय माल्ल्या लवकरच त्याची गर्लफ्रेंड पिंकी ललवाणीसोबत लग्न करणार आहे. विजय माल्याचे हे चक्क तिसरे लग्न असेल त्याची प्रेयसी पिंकी ललवानी गेल्या सात वर्षापासून माल्याशी जवळिक साधून आहे. कर्जाच्या वाईट काळातही तिने त्याची साथ सोडली नाही अन नेहमी त्याच्या सोबत राहिली असे सांगितले जाते. किंगफिशर एअरलाइन्समध्ये फ्लाईट अटेंडन्ट म्हणून काम पाहिलेली पिंकी माल्याची जवळ कधी गेली ते कळलेच नाही. अन आता ते लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची समोर येत आहे.

विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहेत. विजय माल्यांच्या डोक्यावर आज तब्बल ९००० कोटी कर्जाचा डोंगर घेऊन फिरत आहे. पण इतक्या लबाड्या करूनही त्याच्या लाइफस्टाइलवर थोडासासुद्धा परिणाम झाल्याचे दिसत नाही. त्याचे महगडे शौकही कमी न होता वाढले आहेत. मुंबईमध्ये सांगितले जाते कि माल्यांच्या ओल्या पार्टी तर जरा खासच असतात.माल्यांच्या पार्टीत उद्योजगतासह बॉलिवूडमधील नामी हस्तीही आवर्जुन हजेरी लावताना दिसतात त्याच्याशी गरजेपेक्षा जास्त जवळीक साधताना दिसतात.


माल्या यांनी डिसेंबर 2015 ला वाढदिवशी चाहत्यांना गोव्यात आलिशान पार्टी दिली होती.  माल्यांनी या पार्टीत अमाप खर्च केला होता. पार्टीतील माल्यांचा शाही थाट पाहून तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (RBI) तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन चकित झाले होते.