Breaking News
Home / Interesting / मंदिर नवे ट्रस्ट बनवणार !! तर विहिप ने कोरलेल्या शिलांचे काय होणार ?

मंदिर नवे ट्रस्ट बनवणार !! तर विहिप ने कोरलेल्या शिलांचे काय होणार ?

9 नोवेंबर २०१४ ला सुप्रीम कोर्टाने अयोध्येच्या विवादित जागे बाबतीत ऐतिहासिक निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने सरकारला सांगितले कि तीन महिन्यांमध्ये एक ट्रस्ट बनवली जावी जी मंदिर निर्माणाची रूपरेखा तयार करेल.

पण एक ट्रस्ट आधीपासूनच आहे, जीने राम मंदिर कसे असेल याची रूपरेखा बनवलेली आहे. त्यांच्याकडे मंदिर निर्माणाचा नकाशा आहे अन त्यांनी मंदिर निर्माणासाठी लागणारे कोरीव काम केलेले दगड सुद्धा तयार केलेले आहेत. या संघटनेचे नाव आहे विश्व हिंदू परिषद. राम मंदिर निर्माणाबाबत विश्व हिंदू परिषद नेहमीच पुढे राहिली आहे. गेली अनेक दशक मंदिरासाठी लागणाऱ्या दगडांवर कोरीव काम करण्याचे काम त्यांनी अविरतपणे चालू ठेवले आहे. त्यांनी इतक काम केल आहे कि मंदिराचा पहिला मजला या कोरीव दगडांनी निर्माण होऊ शकेल अन तोही अगदी अल्पावधीत.

विश्व हिंदू परिषदेने या कामाची सुरवात फार पूर्वीपासून सुरु केली होती अगदी 1990 सालच्या सुरवातीपासून. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मस्जिद पडली अन त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने एक संस्था निर्माण केली. राम जन्मभूमी न्यास नावाने बनलेल्या या संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दास परमहंस यांना बनवले गेले. मंदिरासाठी लागणारी साधनसंपत्ती गोळा करणे अन दगडांवर कोरीवकाम करण्याची जबाबदारी या संस्थेवर देण्यात आली. “कारसेवकपुरम” या अयोध्येतल्या एका भागात हे काम अविरतपणे सुरु आहे.

मंदिर बनवण्याचे काम हेच ट्रस्ट करणार का ?

निदान आजतरी या प्रश्नाचं उत्तर नाहीये. संपूर्ण मंदिर बनवण्यासाठी लागणाऱ्या दगडांचे ७०% काम पूर्ण झालेले आहे. अन संपूर्ण ग्राउंड फ्लोअर यामधून तयार केला जाऊ शकतो.
विश्व हिंदू परिषदेचे अंतराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे ने मिडीयाला सांगितले कि

“आम्हाला अशा आहे कि, राम जन्मभूमीच्या त्याच डिजाइन नुसार भव्य राममंदिराचा निर्माण होईल. नवीन ट्रस्टला हा प्रस्तावित आराखडा स्वीकारणे अधिक सुविधाजनk असेल. आम्हाला आषा आहे कि २०२४ पर्यंत एक भव्य राम मंदिर अयोध्येत असेल. “

सर्वोच्च कोर्टाच्या निकालानंतर सुब्रामानियम स्वामी, उमा भारती यांनी विश्व हिंदू परिषदेचे नेता अशोक सिंघल यांना आठवले. अशोक सिंघल यांनी आपले संपूर्ण जीवन राम मंदिराच्या निर्मितीसाठी घालवले.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

जाणून घ्या अशा प्रकारे बनली अर्पिता सलमान खान यांची बहीण !

सगळ्यांना माहीतच आहे की खान परिवारामध्ये ‘अर्पिता खान’ ला एखाद्या ‘राजकुमारी’ सारखे ठेवले जाते. अर्पिता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + twelve =